प्रत्येक व्यक्तीसाठी आपला वाढदिवस खूपच खास असतो. ज्या दिवशी आपला जन्म झाला तो दिवस आपल्या आईवडिलांसाठी आणि स्वतःसाठी कधीही न विसरण्यासारखा आहे. ३६४ दिवस वाट पाहिल्यानंतर आपल्या वाढदिवसाचा दिवस उजाडतो. प्रत्येकालाच वाटते की, आपला वाढदिवस खास व्हावा. संस्मरणीय व्हावा. आम पासून खासपर्यंत सर्वच लोकं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वेगवेगळे प्लॅन करतात आणि बर्थडे साजरा करतात. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरापासून, तुमच्या लोकांपासून दूर अशा घरात आहात जिथे फक्त अनोळखी लोकं आहेत, आणि बाहेरच्या जगाशी तुमचा काहीही संबंध नसेल तर? मग कसा वाढदिवस साजरा होईल असेच वाटेल ना सर्वांना. मात्र असे नाहीये नुकताच मराठी बिग बॉसच्या घरात एक वाढदिवस दणक्यात साजरा झाला.
मराठी आणि हिंदी अभिनेत्री स्नेहा वाघ हीच ४ ऑक्टोबरला वाढदिवस होता. स्नेहा सध्या बिग बॉसच्या घरात आहे. मात्र असे असूनही बिग बॉसच्या घरातील लोकांनी केक कापून स्नेहाचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. यावेळी सर्व स्पर्धकांनी एकत्र येत स्नेहल तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिने केक कट केला, त्यानंतर तिला तृप्ती देसाई यांनी केक खाऊ घातला आणि सर्वांकडून तिला एक गिफ्ट देखील दिले.
स्नेहल तृप्ती यांनी गिफ्ट दिल्यावर खूप आश्चर्य वाटले आणि तिने विचारले देखील की, हे गिफ्ट कुठून आले. यावर त्यांनी काहीही उत्तर न देता फक्त आणले असे सांगितले. त्यांनी स्नेहम एक पिवळ्या रंगाचा टि शर्ट गिफ्ट केला. बिग बॉसच्या घरात सणासुदीच्या दिवशी, कोणाचा वाढदिवस असेल तर गोडधोड पदार्थ खाण्याची संधी सदस्यांना मिळते त्यामुळे सर्वच सदस्यांचा मूड खूपच मस्त दिला. या सेलिब्रेशनसोबत घरात अजून काय काय खास घडणार आहे, हे हा भाग पाहिल्यावरच समजेल.
तत्पूर्वी स्नेहा ही मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील गाजलेली अभिनेत्री आहे. ‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक मराठी मालिकांमध्ये काम करताना आहे. पुढे तिने तिचा मोर्चा हिंदीकडे वळवला आणि ‘ज्योती’ मालिकेतून हिंदीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘वीर की अरदास’ मध्ये झळकली.
स्नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप गाजली. वयाच्या १९ व्या वर्षी तिने अभिनेता अविष्कार दार्वेकरशी लग्न केले, मात्र काही वर्षातच त्यांचे लग्न मोडले. पुढे तिने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. मात्र हे लग्न केवळ आठ महिन्यातच तुटले. सध्या स्नेहा बिग बॉसच्या घरात असून, या घरात तिचा पहिला नवरा असणारा अविष्कार दार्वेकर देखील स्पर्धक म्हणून आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त