‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क रंगला आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील थीम टेलिफोन आहे. त्यामुळे या आठवड्याचे नॉमिनेशन टास्क देखील या थीमवर आहे. बिग बॉसने सांगितले होते की, घरातील सदस्यांना त्यांचे मोबाईल परत देणार आहेत. त्यामुळे सगळेच खुश होते. परंतु बिग बॉसने सगळ्यांना पुठ्याचे मोबाईल पाठवले ज्यावर घरातील प्रत्येक सदस्याचा फोटो होता.
यावेळी सदस्यांना एकमेकांचा फोटो असलेला मोबाईल गळ्यात घालायचा असतो. तसेच गार्डनमध्ये एक चार्जिंग बूथ ठेवलेले होते. घरात जितके सदस्य आहेत त्यापेक्षा एक बूथ कमी ठेवलेला असतो. जेव्हा बजर वाजतो, तेव्हा सदस्यांना जाऊन तिथे त्यांच्या गळ्यात असलेला इतर सदस्यांचा मोबाईल चार्जिंगला लावायचा असतो. त्यामुळे ज्या स्पर्धकाला मोबाईल चार्जिंगला लावायला जागा मिळणार नाही. त्याच्या गळ्यात ज्या व्यक्तीचा मोबाइल आहे, तो सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होणार. (Bigg boss Marathi 3, surekha kudachi nominate in this week)
यावेळी विकास, अक्षय, गायत्री आणि मीरा मिळून प्लॅनिंग करत असतात की, कशाप्रकारे स्नेहाला मोबाईल चार्जिंगला लावून द्यायचा नाही. स्नेहाच्या गळ्यात सुरेखा कुडची यांचा मोबाईल होता. याचाच अर्थ त्यांना सुरेखा यांना नॉमिनेट करायचे असते. यावेळी मीरा म्हणते की, “स्नेहाला आत घुसू देऊ नका.” ती अक्षयला सांगते की, “तू स्नेहा उभी आहे तिथे थांब. ती तिथे गेल्यावर तिच्या जाग्यावर ये आणि मध्ये घूस.” यावर अक्षय विचारतो की, “आपल्या जुन्या जागेवर का?” यावर ती म्हणते की, “हे बघ ते तिघे आहेत तिथे आम्ही थांबू, मग स्नेहा थांबेल मग तू थांब. फक्त तिला क्रॉस जा, जिथे जाणार आहेस तिथे.”
अशाप्रकारे मीराने आखलेला गेम प्लॅन यशस्वी होतो. ठरल्याप्रमाणे सगळे करतात आणि स्नेहाला चार्जिंग बूथमध्ये मोबाईल लावण्यास जागा मिळत नाही आणि सुरेखा ताई नॉमिनेट होतात. तसेच त्यांच्या या धक्काबुक्कित स्नेहाला पायाला तो टेबल लागतो आणि सुरेखा ताईंना सांगते की, कशाप्रकारे त्यांनी मला जागा दिली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड
-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज
-तुटलेलं नातं पुन्हा जुळणार? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारने मारली स्नेहाला मिठी