Monday, February 24, 2025
Home मराठी धनश्री काडगावकरचे टेलिव्हिजनवर दणक्यात पुनरागमन, झी मराठीवरील ‘या’ मालिकेत दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

धनश्री काडगावकरचे टेलिव्हिजनवर दणक्यात पुनरागमन, झी मराठीवरील ‘या’ मालिकेत दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर होय. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील तिचे ‘वहिनीसाहेब’ हे पात्र खूपच गाजले होते. ही मालिका चालू असतानाच ती गरोदर असल्याने तिने ब्रेक घेतला होता. परंतु या सगळ्यात ती तिच्या चाहत्यांपासून लांब नव्हती. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडून होती. अशातच धनश्रीबाबत एक मोठी बातमी आली आहे. ती म्हणजे धनश्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. ती झी मराठीवरील एका मालिकेत झळकणार आहे.

तुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्रीने या आधी खलनायिका तसेच मॉर्डन भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत धनश्री दुर्गामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. (Marathi actress dhanashri kadgaokar’s come back on television)

तिच्या या वेगळ्या भूमिकेबाबत बोलताना धनश्री म्हणते की, “माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मधे मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल की नाही, मी काही विसरली, तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. मात्र, मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. ‘घेतला वसा टाकू नको,’ असं मी माझ्या मनाशी पक्कं करून ही भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

धनश्रीने मागच्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री ऋतुजा बागवेने नवीन फोटो केला शेअर; सुंदरता पाहून चाहताही म्हणाला, ‘छान किती दिसते फुलपाखरू’

-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड

-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज

हे देखील वाचा