Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

संघर्षाला सलाम! नोराने वयाच्या सोळाव्या वर्षी केले होते ‘वेट्रेस’चे काम; ८ मुलींसोबत राहायची छोट्याशा खोलीत

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत असते. अशात सुरुवातीला सर्वांनाच काटेरी पायवाट चालावी लागते. त्यांनतर कुठे मखमली गालिचा असलेल्या पदावर आपण पोहोचतो. कलाकारांचे आयुष्य देखील असेच असते. ते देखील सुरुवातीच्या काळात खूप मेहनत घेतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही होय. नोराने देखील मार्गात येणाऱ्या सर्व आव्हानांना पार करत यशाचं शिखर गाठलं आहे. आज नोरा फतेहीची विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. सिनेसृष्टीमध्ये तिच्या अभिनयाने आणि डान्सने तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

नोराने तिच्या आयुष्यात सुरुवातील खूप वाईट आणि अडचणींचा काळ पाहिला आहे. तिच्या आयुष्यातील अडचणींविषयी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण तिने अगदी वेट्रेस पासून ते लॉटरी विकण्यापर्यंतची कामे केली आहेत. (Struggle and success: Nora Fatehi lived in a small PG with 8 girls, sometimes became a waitress and sometimes sold lottery)

नोराने तिच्या आयुष्यातील खडतर दिवसांचा खुलासा नुकताच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तिने यावेळी सांगितले की, “मी जेव्हा १६ वर्षांची होते, तेव्हा मी एका वेट्रेसचे काम केले होते. हे काम माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण यामध्ये तुमचं संवाद कौशल्य उत्तम असणे महत्वाचं आहे. तसेच चांगल्या स्मरणशक्तीसह उत्तम व्यक्तिमत्त्व आणि चपळ बुद्धी असणे देखील गरजेचे आहे. ग्राहकांनुसार परिस्थिती हाताळता आली पाहिजे.”

नोरा कॅनडामध्ये होती, तेव्हा तिच्या संघर्षाविषयी सांगताना पुढे ती म्हणाली की, “मी ज्या पीजीमधील खोलीत राहत होते, तेथे मला ८ मुलींबरोबर ती खोली वापरावी लागत होती. त्यावेळी मला हिंदी बोलता येत नसल्याने मार्गात अनेक अडचणी आल्या. अनेकदा माझ्यावर टीका देखील केली जात होती.”

शरीरावरुनही केली होती टीका
अभिनेत्री एकदा एका कास्टिंग एजंटला भेटली होती. त्यावेळी त्याने तिला खूप अपमानित केले. एवढेच नाही, तर त्याने तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर देखील टीका केली होती. या सर्व गोष्टींचा तिला खूप त्रास झाला होता.

कॅनडामधील संस्कृतीविषयी सांगताना ती म्हणाली की, “इथे प्रत्येक व्यक्तीने नोकरी करणे गरजेचे आहे. अगदी शालेय शिक्षण घेताना देखील अनेक विद्यार्थी नोकरी करतात.”

नोराला पुढे तिच्या फिगरविषयी विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, “इथे स्त्रियांनी स्थूल असणे फार महत्वाचे आहे. इथल्या संस्कृतीचाच तो एक भाग आहे. अनेक महिला स्वतःला स्थूल बनवण्यासाठी मोठी धडपड करत असतात. मी देखील माझे वजन वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यामुळेच मला जास्त खाण्याची सवय लागली आहे.”

नोराच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतीच ‘भुज’ चित्रपटात झळकली होती. तिच्या दिलखेच डान्सने आणि जबरदस्त ठुमके मारत ती सगळ्यांनाच घायाळ करते. तिचे ‘दिलबर दिलबर’ हे गाणे चांगलेच गाजले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाव मोठं लक्षण खोटं! स्वत:च आपली प्रतिमा मलीन करणारे सेलिब्रिटी; एकाने मुलीला काम देण्याच्या बहाण्याने…

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

हे देखील वाचा