Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तिचे ऐकले नाही, तर तिचा तीळपापड होतो’, मीरा जगन्नाथबद्दल बिग बॉसच्या घरात चालू आहे गॉसिपिंग

गॉसिपिंग आणि ‘बिग बॉस मराठी’चे घर हे एक जवळचे नाते आहे. घरातील सदस्य एकत्र टास्क करतात, एकमेकांसोबत राहतात, पण दुसऱ्या क्षणाला जाऊन ते दुसऱ्या सदस्याकडे इतरांची चुगली करतात. या गोष्टी घरात सातत्याने पाहायला मिळतात. आता अशाच गप्पा देखील घरात रंगलेल्या आहेत. घरात दादूस, स्नेहा, तृप्ती आणि सुरेखा यांच्यामध्ये घरातील सर्वात जास्त चर्चेत असणारी सदस्य मीरा जगन्नाथबद्दल चर्चा चालू आहे.

ते चौघेही बेडवर बसलेले असतात, तेव्हा त्यावेळी स्नेहा इतरांना टास्क दरम्यान काय झाले हे सांगत असते. त्यावेळी स्नेहा म्हणते की, “टास्कमध्ये पेंट होता, तेव्हा मीरा म्हणत होती की, यात आपण पाणी घालायचे का?” यावर सगळेच हसतात की, ऑईल पेंटमध्ये पाणी टाकल्यावर ते त्यात मिक्स झालंच नसतं. त्यावेळी स्नेहा म्हणते की, “इतरजण म्हणत होते की, तिचे जर ऐकले नाही, तर तिचा तीळपापड होतो आणि आज देखील तेच झाले होते.”

यावर सुरेखा म्हणतात की, “हो ते दिसलं मला, तिचा मूड ऑफ होता.” यानंतर स्नेहा म्हणते की, “ती स्वतःचे नियम बनवते हे खरं आहे. तीच ठरवते हे असं करायचं किंवा असं करायचं नाही.” (Bigg Boss Marathi 3 : contestant are gossiping about mira jagannath)

बिग बॉसच्या घरात आल्या क्षणापासून मीरा जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये येण्याआधी तिने झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम केले होते. मालिकेतील तिचे मोमो नावाचे मजेशीर पात्र सर्वांना खूप आवडले होते. परंतु घरात आल्यानंतर प्रेक्षकांनी मीराला एका वेगळ्याच अवतारात पाहिले, तेव्हा मात्र सगळेच अवाक् झाले. आता इथून पुढे शोमध्ये ती तिचे कोणकोणते रंग दाखवणार आहे, हे पाहण्यासाठी सगळ्यांना कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री ९: ३० वाजता ‘बिग बॉस मराठी’ पाहावं लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जो वापरेल बेड, त्याच्यावर पडेल रेड’, खेळात अपयश आल्यानंतरही ‘बिग बॉस मराठी’चे सदस्य बनलेत कवी

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा