बेली डान्ससाठी प्रसिद्ध असलेली नोरा फतेही, आज तिच्या प्रतिभेसाठी जगभर चर्चित असते. तिने फिल्मी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. ती सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र नुकतीच तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना अशी माहिती दिली आहे की, ती आता शेफ बनणार आहे.
नृत्यापासून ते अभिनयापर्यंत आपण नोराचे अनेक रंग पाहिले आहेत. पण आता लवकरच नोराचा आणखी एक अंदाज आपल्या समोर येणार आहे. आता नोराने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की ती शेफ बनून चाहत्यांसमोर काही नवीन आणि खास डिश सादर आहे. (nora fatehi shares latest video thanks father and sets remainder for fans)
यासंबंधित तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री काहीतरी खास डिश बनवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, “मी माझ्या वडिलांची खूप आभारी आहे, जे एक शेफ आहेत. मला नेहमी अप्रोन घालायचे होते आणि ‘स्टार vs फूड’ने माझ्यातला एक शेफ हा जागा केला आहे. म्हणून हे लक्षात घ्या की, मी ‘स्टार vs फूड’ सीझन २ मध्ये काहीतरी नवीन काही खास करणार आहे.”
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोराने अतिशय मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. मुलाखतीत तिने अशी एक गोष्ट सांगितली की, आपल्याला त्या गोष्टी वर विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे ती म्हणाली, “मला ते दिवस अजूनही आठवतात, जेव्हा मी वेट्रेस म्हणूण काम करायचे .मी कॅनडात वेट्रेसचे काम करत होते आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी, वयाच्या १६ व्या वर्षापासून ते वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत हे काम केले आहे.”
शिवाय, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला ३ लाखाहून अधिक लाईक्स आणि भरभरून कमेंट्स आल्या आहेत
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस










