Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

गायत्री दातारच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ; कौतुक करत म्हणाले; ‘स्वर्गातील राणी’

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा या पात्राने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार होय. ती इतरांप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या मालिकेत साध्या वेशात दिसणारी गायत्री नेहमीच हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गायत्री सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आहे. अशातच नवरात्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गायत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवरून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या हिरव्या रंगाचे औचित्य साधून काही तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

गायत्रीने इंस्टग्राम अकाऊंटवरून तिचे हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या आणि काळ्या रंगाचा एक स्लीव्हलेस कुर्ता घातलेला आहे. यासोबत तिने कानात मोठे इअरिंग घातले आहेत. तसेच कापली एक छोटीशी टिकली लावली आहे. तसेच केसांची सुंदर स्टाईल केली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (marathi actress gayatri datar green colours dress photo viral on social media)

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने “स्वर्गातील राणी दिसत आहेस,” अशी कमेंट केली आहे, तर अनेकजण या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. काहीजण बिग बॉसच्या घरातील तिच्या खेळाचे कौतुक करत आहेत.

गायत्रीने या आधी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम केले आहे. तसेच ती झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिच्यासोबत सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत होता. तसेच अभिनेत्री गार्गी फुले ही तिच्या आईच्या भूमिकेत होती. बिग बॉसच्या घरात आल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये खूप भर पडली आहे. घरात तिने चांगला खेळ खेळावा आणि शेवटपर्यंत जावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हा पुर्णविराम नाही, तर अर्धविराम…’, अभिनेत्री तेजस्वी पंडीतचे चाहत्यांना खास पत्र; जरुर वाचा

-‘तिचे ऐकले नाही, तर तिचा तीळपापड होतो’, मीरा जगन्नाथबद्दल बिग बॉसच्या घरात चालू आहे गॉसिपिंग

-‘जो वापरेल बेड, त्याच्यावर पडेल रेड’, खेळात अपयश आल्यानंतरही ‘बिग बॉस मराठी’चे सदस्य बनलेत कवी

हे देखील वाचा