Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्वेता तिवारीची मुलगी पलक झाली २१ वर्षांची; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’

अभिनय क्षेत्रात स्वत:ची खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी शुक्रवारी (८ ऑक्टोबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत पलकने देखील अभिनयात आपले नशीब आजमावणार आहे. पलक नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. वाढदिवसानिमित्त देखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

तिने एक रंगीत शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिने या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देत फोटो शेअर केले आहेत. तिच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “बर्थडे इनकमिंग,” असे लिहिले होते.

पलक नेहमीच तिच्या आईचा म्हणजेच श्वेता तिवारीचा आदर्श घेते. आई बरोबर ती सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते. राज चौधरी आणि श्वेताने साल १९९८ मध्ये विवाह केला होता. साल २००० मध्ये त्यांनी पलकला जन्म दिला होता. त्यानंतर साल २०१२ मध्ये हे दोघे विभक्त झाले. पुढे पलक श्वेता बरोबरच राहू लागली.

पलकने मिठीबाई महाविद्यालयातून मानसशास्त्राची पदवी संपादन केली आहे. ती लवकरच ‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनयाची आवड असल्याने ती मॉडेलिंग देखील करते. सोशल मीडियावर सतत स्वतःचे हटके फोटो शेअर करत ती चाहत्यांना खुश करत असते. तिने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोंनी देखील तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. अनेकांनी तिला कमेंटमध्ये हार्ट ईमोजी पाठवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंना आतापर्यंत ७० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट

-‘यामुळे’ देवोलीना भट्टाचार्जीवर भडकले सिद्धार्थ शुक्लाचे चाहते, स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली…

हे देखील वाचा