Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी अर्धमेल्या अवस्थेतच सेटवर पोहोचायचे’, म्हणत स्नेहाने सुरेखा ताईंपुढे शेअर केल्या तिच्या भावना

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व जोरदार गाजत आहे. शोमधील स्पर्धक, त्यांचा खेळ तसेच वैयक्तिक आयुष्य या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. या शोमधील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारे स्पर्धक म्हणजे स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर. हे दोघेही घटस्फोटीत जोडपे आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. तसेच त्यांनी लग्न देखील केले होते. परंतु नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु त्याच्या आयुष्यात नेमके काय झाले होते, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अशातच स्नेहाने सुरेखा ताईंकडे तिचे मन मोकळे करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गार्डनमध्ये झोपाळ्यावर स्नेहा आणि सुरेखा ताई बसलेल्या असतात, तेव्हा स्नेहा त्यांना म्हणते की, “तो अनुभव खुप वाईट होता, मी फार लहान होते. त्या आठवणी पण मला नकोशा वाटतात. खूप दु:खद होतं सर्वकाही. सर्वांनाच सर्व माहित असायचं. माझ्या मालिकेच्या सेटवरच्या लोकांनासुध्दा. रोज माझ्या शरीरावर मारल्याच्या खुणा असायच्या. मी अर्धमेल्या अवस्थेतच सेटवर पोहोचायचे. माझी अवस्था त्यांनाही बघवत नव्हती, पण ते सर्वचजण मला खूप समजून घ्यायचे. मला वेळ द्यायचे.” (bigg boss marathi 3 contestent sneha wagh share her experience of early life with surekha kudachi)

पुढे ती त्यांना सांगते की, “दररोज संध्याकाळी सेटवरुन घरी परतताना मनात एक भीती असायची की, आता आणखी काय वाढून ठेवलं असणार. मला खूप त्रास दिला आहे. मी तो विसरूच शकत नाही. मी पळून गेले आई-बाबांकडे. त्यानंतरही मला खूप त्रास देण्यात आला. मी फक्त १७ वर्षांची होते, तेव्हा मी फार घाबरायचे, पण आता मी ती स्नेहा राहिलेली नाही. घडलेलं कोणीच बदलू शकत नाही. मी पुन्हा त्याच्याकडे परतेन किंवा आमच्यात पुन्हा काही घडेल अशी तिळमात्रही आशा कोणी बाळगू नये. रेतीचा कण असतो तसाही नाही.”

तिचे हे बोलणे ऐकून सुरेखा ताईंना खूप धक्का बसतो. आता पुढे घरात त्यांच्यामध्ये काय घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यासाठी बघत राहा, रोज रात्री ९ : ३० वाजता बिग बॉस मराठी ३ फक्त कलर्स मराठीवर.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’मध्ये कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन? ‘या’ टीमला मिळाली सुवर्णसंधी

-गायत्री दातारच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ; कौतुक करत म्हणाले; ‘स्वर्गातील राणी’

-‘हा पुर्णविराम नाही, तर अर्धविराम…’, अभिनेत्री तेजस्वी पंडीतचे चाहत्यांना खास पत्र; जरुर वाचा

हे देखील वाचा