हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा रविवारी (१० ऑक्टोबर) आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या ६७ व्या वर्षी देखील त्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर भुरळ घालताना दिसतात. आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आणि क्रेझ आहे. कोणत्याही पिढीतील व्यक्तीवर रेखा यांच्या सौंदर्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. यावयातही त्यांचा फिटनेस, सौंदर्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. रेखा या कितीही मोठ्या स्टार असल्या, तरी त्यांचे आयुष्य नेहमीच वादात अडकल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कित्येकदा त्या कोणाच्या नावाचे कुंकू त्यांच्या भांगेत लावतात हा प्रश्न त्यांना विचारला जातो. त्यांच आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपण रेखा यांना जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी, पुरस्कार सोहळ्यांमध्ये बघतो तेव्हा त्यांच्यासोबत एक व्यक्ती सतत आपल्याला दिसते. वयस्कर, गोरीपान, चश्मा लावणारी ही महिला कोण असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असले. आज आपण रेखाजी त्यांच्या वाढिदवसाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत सतत सावली सारख्या असणाऱ्या या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत.
रेखा यांच्यासोबत अनेकदा एक स्त्री दिसत असते. ही स्त्री अर्थातच पुरुषांसारखे कपडे घालते, पण रेखा यांच्यासाठी या स्त्रीपेक्षा जगात विशेष आणि महत्वाचे कोणी नाही. ही स्त्री त्यांच्याबरोबर सावलीसारखी चिकटून आहे. ‘फरजाना’ असे या महिलेचे नाव असून, ती जवळपास ३४ वर्षांपासून रेखा यांच्यासोबत आहे. रेखा जेव्हा चित्रपटांमध्ये नाव कमावत होत्या, तेव्हा फरजाना त्यांचे सर्व काम पाहत होत्या. फरजाना ह्या रेखा यांच्या मॅनेजर आहेत.

दोघींनीही चांगला आणि वाईट काळ एकत्र पाहिला आहे. रेखा यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर जेव्हा त्यांच्यावर आरोप करण्यात आले तेव्हा फरजाना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देत उभ्या होत्या. फरजाना रेखा यांचे डोळे, नाक, कान आणि सल्लागार, मदतनीस यांची भूमिका साकारत आहे. रेखा त्यांच्याशिवाय जगू शकत नाहीत. रेखा यांना कशाचा त्रास होत आहे हे फरजाना यांना चांगलेच माहीत असते.
मोहनदीप यांच्या ‘युरेखा’ या पुस्तकानुसार, रेखा यांचे संबंध त्यांच्या सेक्रेटरी फरजानासोबत आहेत, असा उल्लेख करण्यात आला होता. त्या दोघी पती- पत्नी सारखे सोबत राहतात. असेही या पुस्तकात सांगण्यात आले होते. मात्र रेखा या फरजानाला आपली बहीण मानतात. रेखा यांच्या खोलीत कोणीही येऊ शकत नाही, असे सांगितले जाते. पण फरजानाला येथे फिरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. फरजानाचा ड्रेस आणि चेहराही पुरुषांसारखाच आहे.

नेहमी पांढरे कपडे परिधान केलेली दिसणारी फरजाना ही आधी हेअरस्टायलिस्ट होती. रेखा यांना भेटल्यानंतर फरजाना त्यांचे संपूर्ण काम पाहू लागली. बाहेरील जग आजपर्यंत या दोघींच्या नात्यावर फक्त अटकले लावत आहे, मात्र कोणालाही सत्य माहित नाही.
एक काळ होता जेव्हा लोकं रेखा यांना रागीट आणि काळी मानत होते. लोकं त्यांच्या ड्रेसिंग सेन्सचीही खिल्ली उडवायचे, पण हळूहळू ती वेळही आली जेव्हा रेखा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री बनल्या. रेखा यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १७५ हिंदी आणि दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना तीन वेळा फिल्मफेअर आणि एकदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला असून, त्यांना देशाचा सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…
–आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद
–यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल