Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तब्बल सहा दशकं अभिनयात सक्रिय होत्या दीना पाठक, तर भारतातील पहिल्या डिझायनरसोबत थाटला त्यांनी संसार

बॉलिवूडमध्ये जेवढे महत्व मुख्य नायक आणि नायिका यांना महत्व मिळते, तेवढेच किंबहुना त्याहून जास्त सहायक कलाकारांना मिळते. कारण सहायक कलाकारांमुळेच मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकरांना महत्व प्राप्त होते. बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात अनेक चरित्र कलाकारांनी त्यांच्या सशक्त भूमिकांनी, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आजही जुने सिनेमे बघताना काही कलाकार त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या पडद्यावरील वावरामुळे, त्यांच्या देहबोलीमुळे सदैव स्मरणात राहतात. आजच्या पिढीला जरी त्या कलाकारांची नावे माहित नसली तरी चेहऱ्याने ते सर्वांच्या लक्षात आहेत. जुन्या चित्रपटातील सहायक अभिनेत्रींच्या यादीतला एक ओळखीचा चेहरा म्हणजे दीना पाठक. अगदी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून ते २००० सालापर्यंत पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्षवेधून घेणाऱ्या दीना यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये काम करत सर्वांचे मनोरंजन केले. आज (११ ऑक्टबर) दीना पाठक यांची अठरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

दीना यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी गुजरातच्या अमरेली इथे झाला. त्या किशोरवयीन काळापासूनच्या चित्रपटांकडे आणि अभिनायकडे आकर्षित झाल्या होत्या. मोठ्या होत असतानाच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एकीकडे शिक्षण घेत असताना दुसरीकडे अभिनय करण्याचे काम त्या करत होत्या. अनेक नाटकांमधून काम करत त्या ‘भवाई’ ग्रुपमध्ये सामील झाल्या. हा ग्रुप लोकांना गुजराती लोककला दाखवत. या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना ब्रिटिशांविरोधात जागृत करत स्वातंत्र्याच्या योजनांबद्दल सांगितले जायचे. त्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी असल्यानेच त्यांना मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते.

त्या १९४० सालापासून गुजराती नाटकांमध्ये देखील काम करू लागल्या. सोबतच त्यांचे ‘भवाई’चे कार्यक्रम देखील चालू होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५७ साली त्यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर त्यांनी त्यांची कला सादर केली. त्यानंतर १९४८ साली त्यांनी गुजराती चित्रपटातून काम केले आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हळूहळू त्या हिंदी चित्रपटांकडे वळल्या. दीना यांनी श्याम बेनेगल, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, केतन मेहता, गोविंद निहलानी आदी अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले.

अमिताभ बच्चन, स्मिता पाटील, अमोल पालेकर आदी त्या काळातील मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. दीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया साकारल्या. त्यांच्या करिअरमधील ‘खूबसूरत’ हा सिनेमा विशेष गाजला. तब्बल ६० वर्ष त्या अभिनयात सक्रिय होत्या. या सहा दशकांमध्ये त्यांनी १२० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

दीना जेवढ्या त्यांच्या व्यासायिक आयुष्यामुळे गाजल्या तितक्याच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील त्या प्रकाशझोतात आल्या. दीना यांनी बलदेव पाठक यांच्याशी लग्न केले. बलदेव स्वतःला भारताचे पहिले डिझायनर म्हणून घ्यायचे. पुढे बलदेव आणि दीना यांना रत्ना पाठक आणि सुप्रिया पाठक अशा दोन मुली झाल्या. आज या दोघी अभिनयात काम करताना दिसतात. रत्ना पाठक यांनी नसरुद्दीन शाह तर सुप्रिया यांनी पंकज कपूर या मोठ्या अभिनेत्यांसोबत लग्न केले आहे.

बलदेव हे त्याकाळात मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ कपडे शिवण्याचे काम करायचे. त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्ना, दिलीप कुमार या कलाकारांचे कपडे शिवले होते. मात्र नशिबाचा फेरा फिरला आणि बलदेव यांना त्यांचे दुकान बंद करावे लागले. पुढे काही काळाने त्यांचा मृत्यू झाला.

आजही दीना यांना चित्रपटांमध्ये बघताना त्यांचा अभिनय, आवाज, एक्सप्रेशन नवीन पिढीला खूप काही शिकवून जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा