Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये येणार नवी ‘दया बेन’; सुंदरता पाहून तुम्हीही म्हणाल, अप्रतिम!

नवी दिल्ली। सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये नवीन दया बेन येणार आहे. दया बेनच्या भूमिकेत येणारी नवीन अभिनेत्री पूर्वीच्या दया बेनप्रमाणेच सुंदर आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल
तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम देशात सर्वाधिक चाहतावर्ग असलेला कौटुंबिक कार्यक्रम आहे. जेव्हापासून दया बेन यामधून बाहेर पडली होती, तेव्हापासून चाहत्यांना या कार्यक्रमामध्ये काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. परंतु आता नवीन दया बेन येणार आहे. ती केवळ सुंदरच नाही, तर खूप प्रतिभावानही आहे. नवीन दया बेनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

ऋतुजा जुन्नरकर नवीन दया बेन
‘तारक मेहता का उल्टा चष्माची पूर्ण टीम विकेंडला रिऍलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर सर्वांना दिसणार आहे. दया बेन याच शोच्या सेटवर टीमला मिळाली. जिथे स्टेजवर दया बेनच्या शैलीत शोमधील डान्सर ऋतुजा जुन्नरकरने आपले प्रदर्शन केले. त्यावेळी सर्व टीम आश्चर्यचकित झाली.

ऋतुजाने घेतले दया बेनचे रूप
ऋतुजाने दया बेनचे रूप घेतले. त्यावेळी ती एकदम दया बेनप्रमाणेच दिसली. दया बेनच्या अंदाजात सजलेल्या ऋतुजाने जेठालालसोबत डान्सही केला. असे म्हटले जात आहे की, नवीन दया बेनला पाहताच प्रोड्यूसर असित मोदींनी तिला आपल्या कार्यक्रमात आणण्याचा निर्णय केला आहे.

१२ वर्षे झाली पूर्ण
चाहत्यांना खदखदून हसवणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कार्यक्रमाने आपली १२ वर्षे पूर्ण केली आहेत. यादरम्यान टीआरपीमध्येही जबरदस्त वाढ होत आहे. आता चाहत्यांना दया बेनची कमतरता भासणार नाही. कारण आता एक नवी दया बेन मिळाली आहे.

वाचा- तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जुन्या ‘अंजली भाभी’ ला यायचंय परत , पण निर्मात्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय

हे देखील वाचा