महानायक अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपट जगताचे बादशहा म्हणून ओळखले जातात. गेली अनेक दशकं त्यांनी हिंदी चित्रपट जगतावर अधिराज्य गाजवले आहे. २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी १० पेक्षा जास्त चित्रपटात दुहेरी भूमिका केली आहे, हा एक मोठा विक्रमच म्हणावा लागेल. चला आज जाणून घेऊ या अमिताभ बच्चन यांच्या अशाच दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटांबद्दल.
इंडस्ट्रीमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी दीर्घकाळ अभिनय क्षेत्रात काम करत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप कायम ठेवली आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जाते. या यशाच्या पाठीमागे त्यांच्या व्यक्तिमत्वाइतकाच त्यांच्या कसदार अभिनयाचाही मोलाचा वाटा आहे.
आखरी रास्ता :
१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आखरी रास्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांच्यासोबत श्रीदेवी आणि जया प्रदा सुद्धा झळकल्या होत्या. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

देशप्रेमी :
१९८२ साली अमिताभ बच्चन यांचा देशप्रेमी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याकाळात अमिताभ यांनी मोठमोठ्या एक्शन चित्रपटात काम केले होते. त्यांनी त्यांच्या भूमिकेत मोठ्या प्रमाणावर बदल केले होते. त्यांच्या उमद्या तारुण्याची छाप अभिनयातही दिसून येत होती. देशप्रेमी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काम केले होते.

सुर्यवंशम :
अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या काळात हा चित्रपट पडद्यावर जास्त छाप पाडू शकला नसला तरी नंतरच्या काळात मात्र टीव्हीवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला. या चित्रपटात ही अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.

तूफान :
साल १९८९ मध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘तूफान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन जबरदस्त एक्शन सीन करताना दिसून आले होते. मात्र हा चित्रपट पडद्यावर प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका पाहायला मिळाली होती.

सत्ते पे सत्ता :
‘सत्ते पे सत्ता’ चित्रपट आजही टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाची कथा खूपच रहस्यमय होती. सोबतच चित्रपटात मोठमोठ्या कलाकारांचा सहभाग असल्याने चित्रपट लोकप्रिय ठरला होता. सोबतच अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने ही प्रेक्षकांना आकर्षित केले होते.

महान :
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा ‘महान’ चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन तिहेरी भूमिका साकारताना दिसून आले होते. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आजही हा चित्रपट पाहणे म्हणजे जणू पर्वणीच असते.

लाल बादशाह :
अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल करू शकला नसला तरी, अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, रहस्यमय व्यक्तिमत्व आणि कसदार अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवली होती.

बडे मिंया छोटे मिंया :
बडे मिंया छोटे मिंया हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिनेता गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. बॉलिवूडमधील दोन आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख भूमिकेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

हम :
अमिताभ बच्चन यांचा ‘हम’ हा चित्रपट १९९१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. हिंदी इंडस्ट्रीमधील तीन दिग्गज कलाकारांचा यामध्ये सहभाग होता. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे जणू पर्वणीच होती. चित्रपटात अमिताभ बच्चनसह अभिनेता गोविंदा आणि रजनीकांत यांचा सहभाग होता.

खुदा गवाह :
बिग बी अमिताभ बच्चन यांचा खुदा गवाह १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या काही भागाच चित्रिकरण अफगाणिस्तान मध्ये झाले होते. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट मानला जातो. चित्रपटाला तीन फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री श्रीदेवी झळकली होती. त्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसुद्धा मुख्य भूमिकेत दिसून आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे










