Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आदिश वैद्यने पॉवर कार्ड स्वीकारत ‘या’ तिघांना दिले रात्रभर पहारा देण्याचे काम

बिग बॉस मराठीच्या घरात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. अशातच घरातून अक्षय वाघमारेची एक्झिट झाली आहे. त्यामुळे घरात सगळे सदस्य खूप निराश झाले. एकीकडे घरातील सदस्य या दुःखातून बाहेर येत नाही तर दुसरीकडे घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत होता. त्यामुळे वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे याची सगळ्यांना कल्पना होती. परंतु घरात नक्की कोणता स्पर्धक येणार आहे. या बाबत कोणाला कोणतीच कल्पना नव्हती. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात आदिश वैद्य याची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

आदिश घरात येताच बिग बॉसने त्याच्यावर एक महत्वाची जबाबदारी दिली. बिग बॉसने त्याला पावर कार्ड वापरण्याची परवानगी दिली. त्यावेळी बिग बॉसने त्याला पुढच्या आठवड्याची कॅप्टन्सी दिली आहे. यासोबत जर त्याने हे पॉवर कार्ड स्वीकारले तर याचा परिणाम घरातील सदस्यांवर होणार असे देखील सांगितले. जर आदिशने पॉवर कार्ड स्वीकारले तर घरातील तीन सदस्यांना बिग बॉसची पुढची घोषणा होईपर्यंत रात्रभर उभे राहून घराचा पहारा द्यावा लागणार आहे. (Bigg Boss Marathi 3 : adish vaidya accept power card and become captain of this week)

यावेळी आदिशने हे पावर कार्ड स्वीकारले. त्याने जय, दादूस आणि मीनल यांची नावे घरात पहारा करण्यासाठी बिग बॉसना सुचवले. त्यामुळे आता बिग बॉस पुढचा आदेश देत नाही तो पर्यंत या तिघांना रात्रभर घराचा पहारा द्यावा लागणार आहे. तसेच घरातील कामे वाटप करताना देखील घरात सौम्य प्रमाणात मतभेद दिसून आले. यावेळी मीराला किचनमध्ये स्नेहासोबत काम करायचे नव्हते तरी देखील त्याने स्नेहा आणि मीराला किचन सांभाळायला सांगितले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा