मराठमोळी मानसी नाईक सतत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आता ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना वेड लावत असते. तिच्या मनमोहक अदा कोणालाही वेड लावायला पुरेश्या आहेत.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्याद्वारे तिने चाहत्यांना एक महत्त्वाचा आणि सुंदर संदेश दिला आहे. हे फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मानसी कमालीची सुंदर दिसतेय. नारंगी रंगाची साडी नेसून, ती पदरासोबत खेळताना दिसत आहे. यातील तिच्या अदा आणि तिची स्माईल अगदी कातिलाना आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
अभिनेत्रीचा हा घायाळ करणारा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हे फोटो शेअर करत तिने अतिशय लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय की, “आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही. साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं…बरोबर ना.” फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लाईक्सचाही पाऊस पडत आहे. काही तासातच यावर २१ हजाराहून अधिक लाईक्स आल्याचे पाहायला मिळत आहे.
मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली आलेल्या ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे