Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘…रूल्स गेले उडत’, पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आदिश आणि जयमध्ये वादाची ठिणगी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिलीच वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. एकीकडे अक्षय वाघमारेची घरातून एक्झिट झाली आणि दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. अभिनेता आदिश वैद्य याची घरात एन्ट्री झाली आहे. घरात येता वेळी बिग बॉसने त्याला एक सुवर्णसंधी दिली. बिग बॉसने त्याला पावर कार्ड स्वीकारून या आठवड्यात घरातील कॅप्टन बनण्याची संधी दिली. त्यावेळी त्याने ते पावर कार्ड स्वीकारले. सोबतच बिग बॉसने याचा परिणाम घरातील सदस्यांवर होईल असे सांगितले. यासाठी घरातील तीन सदस्यांना बिग बॉसचा पुढचा आदेश येईपर्यंत रात्री जागे राहून घराची राखण करावी लागेल असे सांगितले. त्यावेळी त्याने मीनल, जय आणि दादूस यांचे नाव घेतले. त्यामुळे आता या सदस्यांना रात्रभर जागून पहारा द्यावा लागणार आहे.

पहिल्याच रात्री सुरुवातीला दादूस आणि जय दाराजवळ उभे राहतात. त्यावेळी जय मुद्दाम खाली बसतो, तेव्हा आदिश तिथे येऊन सांगतो की, “खाली बसण्याची परवानगी नाही.” यावेळी जय म्हणतो की, “असे सांगितले नाही. तू मला बिग बॉसने दिलेले सूचनापत्र आणून दाखव मग मी उभा राहतो.” (Bigg Boss Marathi 3 : quarrel between jay dudhane and adish vaidya)

यानंतर आदिश सूचनापत्र घेऊन येतो आणि जयला दाखवतो. त्यावेळी जय त्याचा आवाज वाढवतो आणि आदिशच्या अंगावर येतो, तेव्हा आदिश देखील खूप चिडतो आणि म्हणतो की, “तुझा ऍटिट्यूड मला नाही दाखवायचा. तुझी बॉडी तुझ्याकडे ठेव मला नको दाखवू.” यावेळी जय सतत तुला आडवा पाडीन असेच म्हणत असतो. यावेळी जय त्याच्या अगदी जवळ येत असतो, तेव्हा आदिश कॅमेरासमोर जातो आणि म्हणतो की, “बिग बॉस परत जर तो माझ्या जवळ आला ना, तर त्याला मी जबाबदार नाही, रूल्स गेले उडत.”

तरी देखील जय काही ऐकत नसतो, तो सारखा त्याच्या जवळ येत असतो, तेव्हा आदिश म्हणतो की, “ये जवळ तुला माझी पप्पी घ्यायची आहे का?” त्यावेळी घरातील इतर सदस्य जयला धरतात आणि त्याला शांत करतात. नंतर आदिश देखील घरात निघून जातो. आदिश घरात आल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्री २०२१: ‘मोहे रंग दो लाल’, म्हणत सुखदाकडून दिलखेचक फोटो शेअर, तर पती अभिजितची कमेंट ठरतेय लक्षवेधी

-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

-‘सौंदर्यासाठी लहान कपड्यांची गरज नाही…’, मराठमोळ्या मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

हे देखील वाचा