बॉलीवूडचे महानायक बिग बी हे सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी ७९ वर्षांचे झाले आहेत. त्यांना कुटुंब, चाहते आणि अनेक मोठ्या कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवेळी प्रमाणे, अमिताभ हे यावेळी देखील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर आले होते आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर अनेकांनी बच्चन साहेबांचे फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बिग बी यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने देखील या खासदिवशी एक खास फोटो शेअर केला आणि सासऱ्यांना बर्थडे विश केले.
ऐश्वर्याने अमिताभ यांचा आराध्यासोबतचा एक क्यूट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅप्पी हॅप्पी बर्थडे डिअर दादाजी लव्ह यू फॉरेव्हर’. फोटोमध्ये बिग बी यांना त्यांची लाडकी नात आराध्या मिठी मारताना दिसत आहे. त्याच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद या फोटोमध्ये स्पष्टपणे सांगत आहे की, ते आराध्यावर किती प्रेम करतात. आराध्याने फोटोमध्ये गुलाबी ड्रेस परिधान केला असून या फोटोमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे.
याआधी बिग बी यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘माझे हिरो’, ‘माझे आदर्श’, ‘माझे मित्र’, ‘माझे वडिल’ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ‘लव्ह यू’. अभिषेकची ही पोस्ट सगळ्या फॅन्सला खूप जास्त आवडली.
यासोबत अमिताभ हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपला एक कोलाज फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रे कलरचे जॅकेट आणि डार्क ग्रे कलरची पॅन्ट घातली असून, हातात दोन बॅग घेतलेल्या दिसत आहे. त्यांनी फोटोच्या खाली कॅपशनमध्ये लिहिले ‘ आता ८०च्या जीवनाकडे’ त्या पोस्टमध्ये त्यांनी आपले वय चुकीचे टाकले होते. त्यावर त्यांची मुलगी श्वेताने त्या पोस्टला करेक्ट केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल
-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’
-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत