Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

TMKOC: अखेरच्या दिवसांत इतरांसह स्वतःचं नावही विसरले होते नट्टू काका, मुलाने केला खुलासा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकारांनी आणि उद्योग क्षेत्रातील अनेक लोकांनी शोक व्यक्त केला. अलीकडेच नट्टू काकांच्या मुलाने आपल्या वडिलांचे शेवटचे दिवस कसे गेले, ते सांगितलं आहे.

घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, वडिलांच्या मृत्यूबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, “शेवटच्या दिवसात पप्पांना श्वास घेणे कठीण होत होते आणि आम्ही त्यांच्यासाठी घरी ऑक्सिजन आणि नर्सची व्यवस्था करत होतो. पण अचानक त्याची तब्येत इतकी बिघडली की, आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळानंतर त्यांना नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. तेव्हा ते थोडे बरे झाले होते, परंतु नंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आलं.” (taarak mehta ka ooltah chashmah ghanshyam nayak aka nattu kaka had forgotten his own name in last days)

कोणालाच ओळखू नव्हते शकत
विकासने पुढे सांगितले की, त्यांच्या मृत्यूच्या १५ दिवस आधी त्यांची साखरेची पातळी अचानक वाढली होती आणि तेव्हा ते कोणालाही ओळखू शकत नव्हते. पण जेव्हा त्यांची साखरेची पातळी खाली आली, तेव्हा त्यांना कळू लागले की, त्यांच्या आजूबाजूला कोण आहे. तो म्हणाला की, “२ ऑक्टोबर रोजी पप्पांनी मला विचारले की, मी कोण आहे. ते त्यांचं नाव सुद्धा विसरले होते. त्यावेळी मला जाणवलं की, ते दुसऱ्या जगात जात आहेत.”

घनश्याम नायक यांचं ३ ऑक्टोबर रोजी निधन झालं. ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले, जेथे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोची संपूर्ण टीम पोहोचली होती. शिवाय ते गेल्या १ वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. घनश्याम नायक यांचं केमो सत्र चालू होतं, तरीही त्यांनी २०२१ मध्ये काम केलं. त्यांनी शोसाठी शूट केलं होतं. याशिवाय त्यांनी एक जाहिरात देखील शूट केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा