Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

समुद्रकिनारी पत्नी अंकितासोबत एन्जॉय करताना दिसले मिलिंद सोमण, व्हायरल होतोय रोमॅंन्टिक व्हिडिओ

अभिनेता मिलिंद सोमण त्यांच्या हटके व्हिडिओ आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अंकिता सोबतच्याही अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिताच्या जोडीला दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकदा ट्रोल केले गेले असले, तरी त्यांची जोडी मात्र खुपच सुंदर दिसते. दोघांचा चाहता वर्गही मोठा आहे. नुकतेच या दोघांचा समुद्रकिनारी रोमांन्स करतानाचा हटके व्हिडिओ समोर आला आहे. अंकिताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही समुद्रकिनारी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येत आहेत.

अंकिताने शेअर व्हिडिओमध्ये, मिलिंद अंकिताला मिठीत घेऊन फिरवताना दिसत आहेत. अंकिताही मिलिंद यांच्या प्रेमात बुडालेली दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटी मिलिंद अंकिताला मिठीतून खाली उतरवत, प्रेमाने किस करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ए आर रेहमानचं गाणं वाजत आहे.

मिलिंद आणि अंकिताच्या जोडीला वयावरुन टीका झाली असली, तरी त्यांच्या जोडीला चाहते चांगलेच पसंत करतात. दोघांना सोबत पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. या रोमॅंन्टिक व्हिडिओला अभिनेत्री अनुष्का शर्मानेही लाईक केले आहे. एका युजरने मिलिंदने अंकिताला उचलून घेतल्याने, ‘लवकर एक मुन्ना घेऊन ये रे’ अशी कमेंट केली आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले, त्यावेळी मिलिंद ५२ तर, अंकिता अवघ्या २६ वर्षांची होती. म्हणजे दोघांच्या वयात तब्बल २६ वर्षाचं अंतर आहे. मिलिंद आपल्या फिटनेससाठीही ओळखले जातात. ते ५४ वर्षांचे असले, तरी त्यांची फिटनेस वाखण्याजोगी आहे. अंकिता आणि मिलिंद वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तरुणांनाही लाजवेल अशी आहे मिलिंद सोमण यांची हॉटनेस, जोरदार व्हायरल होतोय ‘हा’ लूक

-शर्टलेस मिलिंद सोमण यांना पाहून स्वत:ला रोखू शकली नाही मलायका अरोरा, केलं ‘अस्सं’ काही

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

हे देखील वाचा