‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व खूपच गाजलं होतं. या पर्वामध्ये अनेक कलाकार सामील झाले होते. यामध्ये प्रेम, मस्ती, विनोद, मनोरंजन, डान्स, गाणं या सगळ्या गोष्टींचा प्रेक्षकांनी अगदी भरभरून आनंद घेतला होता. यातील स्पर्धक देखील खूप अतरंगी होते. यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुपाली भोसले. रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. रुपाली सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही नवीन लूकमधील फोटो समोर आले आहेत.
रुपालीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तिने पायात हाय हील्स घातले आहेत. तसेच केस मागे बांधले आहेत. तिच्या केसांची डोळ्यावर येणारी एक बट तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडत आहे. (Marathi actress rupali bhosale share her new look on social media)
तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करून तिच्या या नवीन लुकचे कौतुक करत आहेत. अनेकजण हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “आज कॅप्शन नाही का सुचलं?,” अशी कमेंट केली आहे. यावर रुपालीने देखील त्याला “नाही,” असे उत्तर दिले आहे.
रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे, पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली.
सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजले. नकारात्मक भूमिकेत असूनही तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या मालिकेत आपल्याला अनेक वळणं पाहायला मिळत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पृहा तुला बघितल्यावर दिवस खूप छान जातो…’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्यांची लक्षवेधी कमेंट
-नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप