Wednesday, October 15, 2025
Home अन्य ‘मोठ्या व्यक्ती अं’मली पदार्थ घेतात आणि…’, मोहन भागवतांची बॉलिवूडला चापट

‘मोठ्या व्यक्ती अं’मली पदार्थ घेतात आणि…’, मोहन भागवतांची बॉलिवूडला चापट

दसरा आणि विजयादशमी निमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले दिसत आहे. अशात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार यंदा मोठ्या जल्लोषात दसरा साजरा करताना दिसत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक दिवसांपासून चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी ओटीटीचा मार्ग निवडला. अशात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ओटीटी विषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

‘ओटीटीवर काय दाखवावे यावर नियंत्रण नाही’
दरवर्षी मोहन भागवत विजयादशमी निमित्त नागरिकांना त्यांच्या भाषांतून मोलाचे संदेश देत असतात. अशात त्यांनी शुक्रवारी ( १५ ऑक्टोबर) विजयादशमी निमित्त एक भाषण केले. यावेळी यांनी थेट ओटीटीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “ओटीटी प्लॅटफॉर्मवर कसे कसे चित्रपट येतात. आता तर कोरोनामुळे सर्व लहान मुलांच्या हातात मोबाईल फोन आले आहे. त्यावर ते काय बघतात काय नाही याचे काहीच नियंत्रण राहिले नाही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवावे याचेही काही नियंत्रण नाही.”

अं’मली पदार्थांवरुण साधला बॉलिवूडवर निशाणा
पुढे भाषणामध्ये मोहन भागवत असे म्हणाले की, “देशामध्ये वेगवेगळे नशेचे पदार्थ येत आहेत. याच्या सवयी देखील वाढत चालल्या आहेत. हे सर्व कसे थांबवले पाहिजे, कसे नाही याचीही कुणाला काहीच कल्पना नाही. श्रीमंत व्यक्ती पासून ते अगदी एखाद्या गरीब व्यक्ती पर्यंत सर्वच व्यसने करतात.”

देश विरोधी कार्यांमध्ये होत आहे उपयोग
पुढे देश विरोधी कार्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, “हा सर्व पैसा कुठे वापरला जातो सर्वांना माहीत आहे. हा पैसा देश विरोधी कार्यात वापरला जातो. अं’मली पदार्थांवर पूर्णतः बंदी कशी येईल याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.”

शेवटी या सर्वांवर उपाय म्हणून त्यांनी एका वाक्याची आठवण करुन दिली त्यांनी “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक” असे सांगत या सर्वांवर नियंत्रण आणण्याचा संदेश दिला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रेड स्वीमिंग सूटमध्ये कमाल दिसतेय रकुल प्रीत, पूलमध्ये पाहायला मिळाला बोल्ड अंदाज

-…म्हणून राहुल वैद्यला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवक्त्याने उघड केलं कारण

-समुद्रकिनारी पत्नी अंकितासोबत एन्जॉय करताना दिसले मिलिंद सोमण, व्हायरल होतोय रोमॅंन्टिक व्हिडिओ

हे देखील वाचा