Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फारुख जाफर साहिबा काळाच्या पडद्याआड, आज केले जाईल ‘सुपूर्द-ए-खाक’

ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फारुख जाफर साहिबा काळाच्या पडद्याआड, आज केले जाईल ‘सुपूर्द-ए-खाक’

हिंदी सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमध्ये कोणाची मोठी आई, कोणाची वहिनी साकारणाऱ्या, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व बेगम फारुख जाफर साहिबा यांचे निधन झाले आहे. त्यांनी शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळी ७ वाजता लखनऊच्या सहारा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बेगम फारुख जाफर साहिबा ८९ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने, श्वास घेण्यास अडचण आणि सर्दीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय त्यांना दोन मुली आहेत. एक शाहीन आणि दुसरी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मेहरू जाफर. बेगम तिच्यासोबत राहत होत्या. महरु जाफरने सांगितले की, शनिवारी सकाळी १०.३० वाजता मल्लिका जहां स्मशानभूमी, ईशबाग येथे त्यांना दफन केले जाईल. (actress begum farrukh jaffer passed away in lucknow on friday)

‘अशी’ होती कारकीर्द
फारुख जाफर यांनी रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. ‘गीतों भरी कहानी’ नावाचा एक कार्यक्रम संस्मरणीय ठरला, ज्यात त्या गाण्यांच्या दरम्यान ऐकवल्या जाणाऱ्या कथांना आपला आवाज द्यायच्या. शिवाय त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये संध्याकाळचे क्लास घेत असायच्या. त्यांनी लखनऊमध्ये थिएटरही केले आहेत.

एनएसडीमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अल्काझीच्या दिग्दर्शनाखाली इटालियन नाटक ‘सिक्स कॅरेक्टर्स इन सर्च ऍन अदर’मध्ये त्यांनी राष्ट्रीय रंगमंचावर महत्वाची भूमिका बजावली. ‘उमराव जान’, ‘स्वदेस’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘गुलाबो सिताबो’, ‘मेहरुनिन्सा’ या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. बेगम यांना २८ मार्च २०२१ रोजी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा