Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bigg Boss 15: सलमानने घेतली अफसानाची शाळा, ईशान-मायशाच्या नात्यावरही उठवले प्रश्नचिन्ह

‘बिग बॉस १५’मध्ये घरातील सदस्य आणि जंगलवासीयांनी मिळून बिग बॉसच्या घरात प्रचंड गोंधळ घातला आहे. गोंधळाच्या दरम्यान शोच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांवर ताव मारताना दिसला आहे. पंजाबी गायिका अफसाना खानच्या बिघडलेल्या शब्दांवर त्याने तिला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचवेळी, इंटरनॅशनल टेलिव्हिजनवर उघडपणे प्रेम व्यक्त केल्यानंतर, लिप किसमुळे ईशान सेहगल आणि मायशा अय्यर यांच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

बिग बॉसच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये सलमान खान स्पर्धकांवर रागवताना दिसला. त्याने सर्व स्पर्धकांना ‘बिग बॉस १५’च्या मुख्य घरात बोलवले आणि पूर्ण आठवड्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल सांगितले. सलमानने सर्वांना सांगितले की, ते खूप आक्रमक होत आहेत ज्याची गरज नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही, तरीही ते शारीरिक शक्ती वापरत आहेत, ज्यामुळे कोणालाही हानी पोहचू शकते.

अफसानाला शिकवला चांगलाच धडा
या संपूर्ण आठवड्यात अफसाना खान तिच्या वागण्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. सलमानने तिला तिच्या वाईट शब्दांबद्दल चांगलाच धडा शिकवला आहे. एज शेमिंग ते बॉडी शेमिंगपर्यंत त्याने अफसानाला चांगलेच ऐकवले. सलमानने अफसानाला विचारले की, ती योग्य गोष्टी करत आहे का? याला उत्तर देताना ती म्हणाली की, खऱ्या आयुष्यात ती अशी नाही. सलमान तिला अडवतो आणि म्हणतो, “गेल्या दोन आठवड्यांत आम्ही पाहिले आहे की, तू जे बोलतेस तशी अजिबात नाहीस.”

‘मी म्हातारा तर आहे’
तिला सीझनचा सुपरस्टार म्हणून वर्णन करताना सलमान म्हणाला की, “तू शमिता शेट्टीला म्हातारी म्हणालीस, घरी बसण्याची वेळ आली आहे तुझी, घाणेरडी बाई बोललीस. आता तू ठरवणार की घाणेरडं कोण आहे?” मग अफसाना उत्तर देते आणि म्हणते की, “तुम्ही मोठे आहात.” मग अफसानाला अडवत सलमान खान म्हणाला की, ”नाही, नाही, मी म्हातारा आहे.” स्पष्टीकरण देत अफसाना म्हणते की, ती हे सर्व रागात बोलले होती.

इंडस्ट्रीत टिकणे कठीण
सलमान उत्तर देत म्हणाला की, “रागाच्या भरात तू काहीही बोलशील का? फक्त तुझी जीभच नाही, तर तुझे हातही खूप चालतात. तुझा एक सेट पॅटर्न आहे. जर मी निवडू शकलो असतो, तर मी तुला या घरातून बेघर केले असते.” अफसाना पुन्हा म्हणाली की, “मला काहीच अडचण नाही. मी घर सोडायला तयार आहे.” सलमानने अफसानाला फटकारले आणि म्हटले की, “जर तुझी वृत्ती अशीच राहिली, तर तू इंडस्ट्रीमध्ये २५ दिवसही टिकू शकत नाही.”

ईशान-मायशालाही घेरले
ईशान आणि मायशाला सावध करत सलमानने त्यांना विचारतो की, “हे कसे दिसत आहे?” तो म्हणाला की, “या गोष्टीवर लक्ष ठेवले पाहिजे की, आपण काय करतो आणि ते टीव्हीवर कसे दिसेल.” तो म्हणाला की, ऑनस्क्रीन या गोष्टी चांगल्या प्रकारे समोर येत नाहीयेत. तो म्हणाला की, त्यांनी असाही विचार केला पाहिजे की, जर ते भविष्यात एकत्र आला नाही, तर हे सर्व पाहून त्यांना कसे वाटेल. त्यामुळे थोडे डोकं लावून पुढे जाणे चांगले.

मायशाची घेतली शाळा
घरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल मायशाला क्रिटिसाइज व्हावे लागते. यावेळी सलमानने तिला बाथरूममध्ये धूम्रपान केल्याबद्दल फटकारले. तो पुढे म्हणाला की, “तुम्हाला करायचे आहे, ही तुमची मर्जी आहे. पण ते अशा प्रकारे करा की, कोणालाही कळणार नाही.” आता हे पाहावे लागेल की, सलमान कोणाची चूक माफ करेल आणि कोणाला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…

-‘बिग बॉस १५’मध्ये अफसाना खानचं ‘जंगली रूप’; अकासा सिंगचा फाडला शर्ट, तर शमिता शेट्टीला म्हणाली ‘म्हातारी’

-‘बिग बॉस’च्या घरात सुरू झालीय ‘दंगल!’ लाथ मारून नखे ओरबडल्याचा आरोप लावत, मायशाने डोनलला केली शिवीगाळ

हे देखील वाचा