Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड ‘स्टुडंट ऑफ द इयर’ला ९ वर्षे पूर्ण; करण जोहरच्या तिन्ही ‘स्टुडंट्स’चा आज बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला!

‘स्टुडंट ऑफ द इयर’ला ९ वर्षे पूर्ण; करण जोहरच्या तिन्ही ‘स्टुडंट्स’चा आज बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला!

दिनांक १९ ऑक्टोबर २०१२ रोजी, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडला तीन नवीन ‘स्टुडंट’ दिले होते आणि तेव्हापासून हे तिघेही इंडस्ट्रीमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. आज आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ रिलीझ होऊन नऊ वर्षे झाली आहेत.

करण जोहरचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि तो त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आलिया, वरुण आणि सिद्धार्थ व्यतिरिक्त या चित्रपटात ऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर, गौतमी कपूर, साहिल आनंद, सना सईद आणि फरीदा जलाल यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात आलिया, वरुण आणि सिद्धार्थची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली गेली होती. त्यानंतर आत्तापर्यंत आलिया-वरुण आणि आलिया-सिद्धार्थची जोडी अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. आता आपण आलिया आणि वरुणच्या जोडीच्या चित्रपटांबद्दल बोलूया. (student year turns 9 alia bhatt varun dhawan alia bhatt sidharth malhotra karan johar)

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटात आलियाने अंबाला येथील एका मुलीची भूमिका साकारली होती, तर वरुणने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. तसेच दिवंगत सिद्धार्थ शुक्ला हा एनआरआय अंगदच्या भूमिकेत होता. दिग्दर्शक शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट हिट ठरला. यासोबतच प्रेक्षकांना चित्रपटाची गाणीही खूप आवडली.

साल २०१७ मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शक शशांक खेतान, वरुण धवन आणि आलिया भट्ट या त्रिकुटाने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर हजेरी लावली. या चित्रपटात आलिया भट्ट हवाईसुंदरी बनण्याची इच्छा असलेल्या वैदेही त्रिवेदीच्या भूमिकेत होती. तर वरुण धवन तिच्या मंगेतर बद्रीनाथ बंसलच्या भूमिकेत होता. हा चित्रपटही हिट ठरला.

आलिया भट्ट आणि वरुण धवनची हिट जोडीचा तिसरा चित्रपट होता अभिषेक वर्मनचा ‘कलंक’. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका होत्या. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करू शकला नाही.

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या जोडीबद्दल बोलायचं झालं, ते ‘स्टुडंट ऑफ द इयर’ व्यतिरिक्त आलिया ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटात एकत्र दिसले आहेत. त्यांच्याशिवाय ऋषी कपूर, रत्ना पाठक शाह, रजत कपूर आणि फवाद खान हे देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली होती.

चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. एकंदरीत बोलायचं झालं, तर या चित्रपटातील तिन्ही ‘स्टुडंट्स’ आज बॉलिवूडचे यशस्वी कलाकार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियाचे बीच फोटो नेहमीच घालतात सोशल मीडियावर राडा, अभिनेत्रीच्या हॉट लूकवर एक नजर टाकाच

-वरुण धवनची ‘ही’ जाहिरात पाहून भडकले नेटकरी; लावला अश्लीलता पसरवण्याचा आरोप

-सिद्धार्थ मल्होत्राला मिळाली चिमुकली कियारा आडवाणी, व्हिडिओ शेअर करत म्हणतोय…

हे देखील वाचा