Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईत या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. दरम्यान न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. तिच्या वांद्रे स्थित घरावर छापा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर त्यानंतर आता एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचली आहे. (ncb raid at ananya panday house in aryan khan drug case)

माध्यमातील वृत्तानुसार, अनन्याच्या घरात ४ ते ५ तास तपास सुरू होता. टीम अनन्याच्या घरून काही सामानही घेऊन गेली आहे. मात्र ते सामान नेमकं काय आहे, याची माहिती अद्याप अमोर आलेली नाही. शिवाय तिला आज (२१ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. खरं तर अभिनेत्रीचे आर्यन खानसोबत काही व्हॉट्सऍप चॅट्स समोर आल्याचे म्हटले जात आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही.व्ही.सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय टीम पहाटे पहाटे अनन्या पांडेच्या घरी पोहोचली होती.

दुसरीकडे, शाहरुखकडे त्याच्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी केवळ सात दिवस आहेत. कारण लवकरच न्यायालयात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आर्यन खानचे वकिल त्याला लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जामीन मिळवण्यासाठी किंग खानकडे आहेत केवळ सात दिवस, मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहचला अभिनेता

-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

हे देखील वाचा