आजकाल ‘बिग बॉस सीझन १५’च्या घरात धमाकेदार ड्रामा पाहायला मिळत आहे. स्पर्धकांना धडा शिकवण्यासाठी बिग बॉसने पुन्हा एकदा युक्ती रचली आहे. हे सर्व आगामी भागाच्या झलकमध्ये पाहायला मिळालं आहे. जय भानुशाली, जो कालपर्यंत म्हणत होता की तो ‘ऍक्सेस ऑल एरिया’ तिकीट टास्क खेळण्यास तयार नाही. आता तोच म्हणतोय की तो विजयाची रक्कम कोणासोबतही शेअर करणार नाही. हा बदल जय भानुशाली मध्ये कसा आला? चला जाणून घेऊयात.
शोच्या नवीन प्रोमोमध्ये असे दिसून आले की, जय भानुशाली सतत प्रतीक सेहजपालला टास्क खेळण्यापासून रोखतो. यानंतर या दोघांमध्ये खूप भांडणे होतात. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो, तेव्हा अचानक विश्वसुंदरी त्यांना असं काही सांगते, जे ऐकून सगळेच स्तब्ध होतात. (bigg boss 15 viswasundree shocked everyone with announcement choose elimination or sacrifice 25 lakh from prize money)
विश्वसुंदरी घोषित करते की, आता जंगलवासींसमोर दोन पर्याय आहेत. एकतर बक्षीस रकमेतून २५ लाख रुपये गमावल्यानंतर मुख्य घरात प्रवेश करा किंवा शो सोडा. विश्वसुंदरीच्या या घोषणेने सर्व जंगलवासींना धक्का बसला. आता या घोषणेनंतर जंगलवासी काय निर्णय घेतात, हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.
आधीच्या भागांमध्ये, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे ठरवतात की ते प्रत्येकाला साडेतीन लाख रुपये देतील. त्याने तिकिटांचा पहिला सेट जिंकला. यानंतर, शमिता शेट्टी आणि विशाल कोटीयन यांनी ठरवले की, ते आठ लाख रुपयांसाठी खेळतील आणि बाकीच्या कुटुंबाला चार लाख रुपये देतील. शो आता एक अतिशय मनोरंजक वळणावर येऊन पोहचला आहे. जे बिग बॉसच्या या घरात मित्र होते ते आता शत्रू बनले आहेत आणि जे शत्रू होते, त्यांना आता मित्र म्हणून पाहिले जात आहे. आता हे पाहावे रंजक ठरेल की, जंगलात राहणारे इतर लोक घरात जातील की शो सोडायचे ठरवतील?
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे
-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा
-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात