‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक गोष्टी घडत आहेत. शोमध्ये अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. प्रत्येक स्पर्धकाचे खरे चेहरे समोर येत आहेत. मागच्या आठवड्यात घरात स्पर्धकांनी नुसता हल्लाबोल केला आहे. घरात फक्त भांडण, राडे झाले आहेत. तसेच टास्कमध्ये देखील अनेक भांडण, धक्काबुक्की झाली. त्यामुळे या वर्षी प्रेक्षक बिग बॉस स्पर्धकांवर काहीशा प्रमाणात नाराज आहेत. या वीकेंडला मांजरेकरांनी देखील सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. घरातील प्रत्येक सदस्याला त्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच घरात कोणीच प्रामाणिक खेळ खेळत नाही, असे देखील सांगितले. या सगळ्यात ते घरातील महिलांना खूप ओरडले, तसेच कोणीही गेम खेळत नाही असे सांगितले. यात त्यांनी मीनलचे तोंड भरून कौतुक केले की, सगळ्या पुरुषांच्या बरोबरीने ती खेळत होती आणि सगळ्यांना भारी पडत होती.
या आठवड्यात घरात मीनल, दादूस, आदिश आणि विकास हे स्पर्धक नॉमिनेट होते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोण बाहेर जाईल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अशातच घरातील काही सदस्यांनी टास्क दरम्यान काही प्रॉपर्टी तोडल्यामुळे बिग बॉसने त्यांना थेट नॉमिनेट केले.ते स्पर्धक होते विशाल, मीरा आणि स्नेहा. यामुळे त्यांच्यात खूप नाराजी निर्माण झाली. (bigg boss marathi 3: adish vaidya evicted from show)
या आठवड्यात वोटिंग लाईन देखील खुल्या होत्या. त्यामुळे नियमाप्रमाणे एकाला या आठवड्यात घराबाहेर जावे लागणार होते आणि अखेर तो घराबाहेर जाण्याचा क्षण आला. यामुळे स्पर्धकांसोबत सगळ्या प्रेक्षकांच्या मनात देखील खूप धाकधूक चालू होती. या आठवड्यात या घरातील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला स्पर्धक आदिश वैद्य घरातून बाहेर गेला आहे. आदिश दोन आठवड्यापूर्वी घरात आला होता.
आल्या आल्याच अनेकांना तो आवडला होता तर घरातील अनेक सदस्यांसाठी तो खलनायक बनला होता. परंतू टास्कमध्ये त्याने खूप चांगले काम केले. तरीही त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा न मिळाल्याने घरातून बाहेर जावे लागले. त्याच्या जाण्याने घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटले. घरातील आल्यानंतर मांजरेकरांनी त्याला मंचावर त्याचा घरातील दोन आठवड्याचा प्रवास दाखवला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत