तमिळ चित्रपट ‘कुझांगल’ला ९४ व्या ऍकेडमी पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेशासाठी नाव पुढे केले आहे. याचे दिग्दर्शक विनोतराज पी. एस. हे आहेत. या चित्रपटाची कहाणी दारू पिऊन आपल्या पत्नीला मारझोड करणाऱ्या एका पुरुषाची आहे. यामध्ये वैतागून ती पत्नी घर सोडून निघून जाते. नंतर तो व्यक्ती त्याच्या लहान मुलाल घेऊन तिला शोधायला जातो. या चित्रपटात अनेक नवी कलाकार आहेत. याची निर्मिती विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांनी केली आहे.
शिवनने ट्वीटरवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “कदाचित हे ऐकायला येण्याची संधी येऊ शकते… आणि ऑस्कर दिला जातो. आपल्या आयुष्यातील आपली स्वप्न साकार करण्यासाठी केवळ काही पाऊले मागे आहोत.” त्यांचे असे म्हणणे आहे की, दिलेल्या पाठींबा आणि प्रेमासाठी ते आभारी आहेत. त्यांनी पुढे लिहिले आहे की, “ही बातमी ऐकल्याच्या आनंदापेक्षा जास्त कोणताच मोठा आनंद नाही.” (Tamil film koonzhagal official entry from india to 94 th academy awards)
There’s a chance to hear this!
“And the Oscars goes to …. ???????????????????????? “
Two steps away from a dream come true moment in our lives …. ❤️❤️????????????????????????????#Pebbles #Nayanthara @PsVinothraj @thisisysr @AmudhavanKar @Rowdy_Pictures
Can’t be prouder , happier & content ???? pic.twitter.com/NKteru9CyI
— Vignesh Shivan (@VigneshShivN) October 23, 2021
या वर्षाच्या सुरुवातीला ‘कुंझागल’ला ५० वा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल रोटारडम सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठी टायगर पुरस्कारने सन्मानित केले होते. ९४ व्या ऍकेडमी पुरस्कार कार्यक्रमचे आयोजन लॉस एंजिलिसमध्ये २७ मार्च २०२२ला होणार आहे.
या बातमीने तमिळ प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. ‘कुंझागल’ हा अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी, पात्र आणि डायलॉग सगळ्यांच्या पसंतीस उतरले होते. तसेच चित्रपटात अनेक नवीन कलाकार असल्याने चित्रपटात काहीतरी नाविन्यता दिसून आली. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फोटोमधील या छोट्या चिमुरल्याला ओळखलं का? आज आहे खूप मोठा सुपरस्टार
-तमन्ना भाटिया ‘मास्टरशेफ तेलुगू’ शोवर करणार कायदेशीर कारवाई, काय आहे पूर्ण प्रकरण?