Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फीने दाखवली आपल्या बॉयफ्रेंडची पहिली झलक; व्हिडिओ पाहून तुटेल चाहत्यांचे मन

छोट्या पडद्यावर अनेक शो आहेत, ज्यांनी खूप कमी काळात मोठे स्थान निर्माण केले आहे. शोसोबतच त्यातील कलाकार आणि स्पर्धकांनीही अमाप लोकप्रियता मिळवली आहे. असाच एक शो म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी’ होय. यासोबतच यातील स्पर्धक म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी’मधून काही दिवसातच लोकप्रियतेचे शिखर गाठले. सध्या ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी जोडून राहते. अशातच उर्फीने आपल्या चाहत्यांचे मन तोडले आहे. तिने सांगितले आहे की, ती सिंगल नाहीये. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओतून आपल्या बॉयफ्रेंडची झलकही दाखवली आहे.

उर्फीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक
उर्फीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, तिला बॉयफ्रेंड आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या बॉयफ्रेंडला भेटा.”

खरं तर, उर्फीने हा व्हिडिओ मोज ऍपवर बनवला आहे. यामध्ये तिने Ogre हे फिल्टर वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये ती किस करतानाही दिसत आहे. यात ती खूप मस्ती करत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘मोह मोह के धागे’ हे गाणेही वाजत आहे. (Bigg Boss Ott Fame Urfi Javed Showed The First Glimpse of Her Boyfriend Watch Video)

उन्हात या अंदाजात दिसली होती अभिनेत्री
नुकतेच उर्फीने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले दोन लेटेस्ट फोटो शेअर केले होते. या फोटोत दिसते की, ती गार्डनमध्ये गवतावर उन्हात झोपली होती. यादरम्यान तिने काळ्या रंगाच्या ब्रालेटसह डेनिम जीन्सही परिधान केली होती. या ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणे उर्फी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांना घायाळ करत आहे.

बोल्ड फोटो व्हायरल
उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडताच उर्फी पॅपराजींची आवडती बनली आहे. लखनऊची राहणारी उर्फी नेहमी विमानतळावर स्पॉट होते. तसेच पॅपराजी आपल्या कॅमेऱ्यात उर्फीला कैद करण्यासाठी उत्सुक असतात. उर्फीही कधीच त्यांना निराश करत नाही. ती त्यांच्यासमोर बोल्ड पोझही देते. आपल्या वाढदिवशी हॉट फोटोंनी इंटरनेटवर आग लावणारी उर्फी म्हणाली होती की, तिला कोणाचीही पर्वा नाहीये. उर्फी आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेचा विषय बनत असते.

हे देखील वाचा