हिंदी टीव्ही मालिकांची लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार सोशल मीडियावर सतत एक्टिव असते. दिशाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अलीकडेच जुलै महिन्यात दिशा गायक राहुल वैद्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. त्यामुळे लग्नानंतर तिची ही पहिलीच करवाचौथ होती. त्यामुळे करवा चौथ साजऱ्या करणाऱ्या दिशाच्या चाहत्यांनासुद्धा या क्षणाची उत्सुकता होती. दिशाने सुद्धा पती राहुल वैद्यसोबतचे पहिली करवाचौथ साजरी करतानाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिशाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
‘प्यार का दर्द है मीठा मीठा’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिशा परमारने गायक राहुल वैद्यसोबत जुलै महिन्यात विवाह केला होता. त्यामुळे लग्नानंतर दिशाच्या पहिल्या करवाचौथची तिच्यासह तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागली होती. यावेळी दिशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेले करवाचौथचे सुंदर फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दिशा खूपच सुंदर आणि मोहक दिसत आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये दिशाने काही फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बांगड्यांचा चूडा दाखवताना दिसत आहे तर आणखी एका फोटोत दिशाचे महागडे मंगळसुत्र लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये दिशा खूपच सुंदर आणि मोहक दिसत असून तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना मोहित केले आहे. दिशाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, ११ नोव्हेंबर १९९२ रोजी दिल्लीत जन्मलेल्या दिशाने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा’ मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१६ मध्ये ‘i don’t watch tv’ नावाच्या वेबसिरीजमध्ये सुद्धा ती दिसून आली होती. दिशा प्रसिद्ध गायक राहुल वैद्यसोबत जुलै २०२१ मध्ये विवाह बंधनात अडकली. राहुलने दिशाला ‘बिग बॉस १४’ मध्ये तिच्या वाढदिवसादिवशी प्रपोज केले होते. सध्या ती एकता कपूरच्या ‘बडे अच्छे लगते है २’ मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ
-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर