‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून पहिला वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक आदिश वैद्य नुकताच घराबाहेर गेला आहे. मागील आठवड्याचा वीकेंड चांगलाच रंगला होता. मांजरेकरांनी घरातील सगळ्या सदस्यांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव करून दिली होती. तसेच काही मोलाचे सल्ले देखील दिले होते. अशातच आता नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. म्हणजेच या शोमधील सहावा आठवडा चालू झाला आहे. हा खेळ जसजसा पुढे जात आहे. तसतसा तो आणखी कठीण होत चालला आहे.
या आठवड्यात घरात दादूस हे कॅप्टन आहेत. त्यामुळे या आठवड्याचे सगळे नियम त्यांनी बनवले आहेत. अशातच घरात काम चालू असताना बिग बॉसने त्यांना कन्फेशन रूममध्ये बोलावले. त्यावेळी बिग बॉसने त्यांना त्यांचा घरातील अनुभव काय आहे हे विचारले. तसेच त्यांना सांगितले की, तुम्हाला कोणीतरी भेटायला येणार आहे. यानंतर काही माणसे काळ्या रंगाची वस्त्र घालून आली आणि दादूसला पकडुन घेऊन गेली. यावर दादूस मोठ्याने मला सोडा, वाचवा असे म्हणत होते. (Bigg Boss Marathi 3 : dadus get kidnap from bigg Boss)
यावर घरातील सगळेच सदस्य घाबरतात आणि दादूस यांना शोधायला कन्फेशन रूममध्ये जातात, परंतु तिथे कोणीच नसते. यावेळी बिग बॉस घोषणा करतात की, या घराचे रूपांतर आता अद्भुत नगरात झाले आहे. इथे नरक आणि स्वर्ग अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे आता घरातील सदस्य ठरवतील की, घराला नरक बनवायचे की, स्वर्ग. तसेच हे देखील सांगतात की, या अद्भुत नगरातील माणसांनी दादूस यांचे अपहरण केले आहे. ते पुढे सांगतात की, या आठवड्याचे घरातील कॅप्टन म्हणजेच दादूस हे या अद्भुत नगराचे राजे असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना त्यांना खुश ठेवावे लागणार आहे. तसेच त्यांनी केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यानंतर काही वेळाने दादूस घरात परत येतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत