Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉस मराठी: ‘जय वीरू’ची जोडी तुटणार? विशालने केले ‘असे’ कृत्य की, विकासला अनावर झाले अश्रू

‘बिग बॉस’चे घर असे आहे की, यात पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. आज एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे मित्र उद्या कधी जाऊन एकमेकांचे दुश्मन होतात हे समजत देखील नाही. इथे खेळासाठी आणि जिंकण्यासाठी नात्यांना महत्व देत नाहीत. अनेकवेळा तर असे पाहायला मिळते की, जीवाभावाची माणसे आपल्याच माणसांच्या विरोधात गेम प्लॅन करत असतात. असेच काहीसे आता ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात पाहायला मिळत आहे.

घरात आल्यापासून दोन नावं महाराष्ट्रभर गाजत आहेत. ती म्हणजे विशाल निकम आणि विकास पाटील. अगदी सुरुवातीपासून या दोघांमधील घट्ट मैत्री आपण सगळ्यांनी पाहिली आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे सदस्य सोबत असतात. त्यांच्या मैत्रीचे देखील सगळ्यांना कौतुक होते. एवढंच काय तर दुसऱ्या टीममधील स्पर्धकांना त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी मैत्री होती. परंतु मागील आठवड्यापासून त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झालेली दिसत आहे. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between Vishal nikam and vikas patil)

मागील आठवड्यात सोनाली आणि विशाल यांचे काही वाद झाले. तेव्हा सोनाली विकासजवळ येऊन विशालबद्दल बोलत होती. तेव्हा सोनाली विकासला म्हणत होती की, “त्याला एकतर ग्रुपमध्ये ठेव नाहीतर काढून टाक, तसेच तो आपल्याला माणसांना पायाखाली देखील घेऊ शकतो.” ही गोष्ट विशालला वीकेंडमध्ये चुगली बूथमध्ये त्याच्या एका चाहत्याने सांगितली. तेव्हापासून विशालचे मत बदलल्यासारखे दिसत आहे.

अशातच घरात नॉमिनेशन टास्क झाला आहे. या टास्कमध्ये स्वर्गात जाणारे सदस्य या आठवड्यात सुरक्षित असणार आहेत तर नरकात जाणारे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या टास्कचे संचालक दादूस हे आहेत. तसेच बिग बॉसची प्रॉपर्टी तोडल्याने मागच्या आठवड्यात बिग बॉसने विशाल, स्नेहा आणि गायत्री यांना या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केले होते. त्यामुळे कोण नरकात जाणार आणि कोण स्वर्गात जाणार यासाठी विशाल, स्नेहा आणि मीरा यांना देखील मत व्यक्त करायला सांगितले होते.

यावेळी जेव्हा विकासची वेळ आली तेव्हा त्याच्यासोबत मीनल होती. तेव्हा दोघेही हे पटवून देत होते की, ते कशाप्रकारे चांगले खेळतात. त्यावेळी विशाल नरकात जाण्यासाठी विकासचे नाव घेतो आणि तो टास्कमध्ये मीनलपेक्षा कमी योगदान दाखवतो असे सांगितले. यावेळी विकासला खूप वाईट वाटले. नंतर जाऊन तो खूप रडतो. हे पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटले आहे. त्यांची मैत्री सगळ्यांना खूप आवडते परंतु या घटनेनंतर त्यांच्यात फूट तर पडणार नाही ना? असे प्रश्न सगळेजण उपस्थित करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाप रे! ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून झाले दादूस यांचे अपहरण, घरातील सदस्य लावतायेत शोध

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ माजी स्पर्धकांनी केली पाहुणे म्हणून एन्ट्री, स्पर्धकांना दिले मोलाचे सल्ले

-बिग बॉस मराठी: ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’ आदिश वैद्यच्या प्रवासाला पूर्णविराम, दाखवला दोन आठवड्याचा प्रवास

हे देखील वाचा