Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड ‘गणपत’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात, अमिताभ बच्चन साकारणार टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका?

‘गणपत’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात, अमिताभ बच्चन साकारणार टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका?

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची वाट प्रेक्षक मागील अनेक दिवसापासून पाहत आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे चित्रपटाची शूटिंग बंद होती. आता लवकरच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे. या चित्रपटाचे अनेक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. हा चित्रपट दोन भागात बनवला जाणार आहे. टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.

असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ देखील खास भूमिका निभावणार आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, या चित्रपटात टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन हे निभावणार आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन यांच्याशी ‘गणपत’ या चित्रपटात टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका निभावण्यासाठी संपर्क केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात टायगर एका बॉक्सरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच त्याचे वडील देखील सुरुवातीच्या दिवसात बॉक्सर होते. त्याचे हे पात्र खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे निर्माते अमिताभ बच्चन यांना या चित्रपटात घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (Tiger Shroff and amitabh bachchan work together in ganpath movie, makers aproach bigg b)

या चित्रपटाच्या तारखा तसेच बाकी अनेक गोष्टी अधिकृत करणे बाकी आहे. या चित्रपटात अत्यंत महत्वाच्या सीनची शूटिंग यूकेमध्ये केली जाणार आहे. ज्यासाठी टायगर आणि क्रिती आधीच लंडनमध्ये पोहोचले आहेत. चित्रपटाची शूटिंग जवळपास २ महिन्यात पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी ही ऑफर मान्य केली, तर टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना नक्कीच मिळेल.

‘गणपत’ चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल हे आहेत, तर ‘वासू भगनानी’ हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या आधी टायगर आणि क्रितीने २०१४ साली आलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटात काम केले आहे. आता ते दोघे दुसऱ्यांदा ‘गणपत’ चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. टायगर सध्या ‘हिरोपंती २’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा