Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आर्यन खान: जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान गर्दीमुळे तुटला कोर्टरूमचा दरवाजा, आज ३ वाजता होईल सुनावणी

मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, दररोज त्याच्याशी संबंधित छोट्या-मोठ्या बातम्या समोर येत आहेत. सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. मात्र, कालही आर्यनला जामीन मिळू शकला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आज (२७ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.

गर्दीमुळे तुटला न्यायालयाचा दरवाजा
दरम्यान, कोर्टातून असे फोटो समोर आहे आहेत, जे पाहून सर्वच चकित झाले आहेत. या फोटोमध्ये कोर्टरूमचा दरवाजा तुटलेला दिसत आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान एवढा मोठा जमाव जमला होता की, कोर्टरूम लोकांनी भरून गेले होते. त्यामुळे कोर्टरूमचा दरवाजाच तुटला गेला. या खटल्याची सुनावणी एन.डब्ल्यू.सांब्रे यांच्याकडे सुरू असताना, पोलिसांनी लोकांना खोलीतून बाहेर काढण्यासाठी ते काही वेळासाठी खोलीतून बाहेरही गेले होते. (aryan khan bail plea hearing courtroom door broke down due to swelling crowd out hearing will continue today)

हायकोर्टाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असलेली कोर्टरूम आहे. या खोलीत वकील आणि मीडिया रिपोर्टर्सची प्रचंड गर्दी जमली होती. आर्यन खानच्या केसचा क्रमांक ५७ होता. कोर्टरूममध्ये जमलेली गर्दी पाहून, न्यायाधीशांनी कर्मचाऱ्यांना ज्या वकिलांची प्रकरणे जास्त गंभीर नाहीत त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.

या गर्दीमुळे कोरोनाचे नियमही पाळले जात नाहीत, असे न्यायाधीशांनी म्हटले नाही. यानंतर अनेक वकील आणि मीडिया रिपोर्टर्सना बाहेर काढण्यात आहे. संध्याकाळी चार वाजता लोकांचा मोठा जमाव कोर्टात जमला होता आणि आर्यनचे वकील मुकुल रोहतागी यांना या गोंगाटामुळे युक्तिवाद मांडणे कठीण झाल्याचे दिसत होते. यानंतर न्यायालयाचा दरवाजाही तुटला, जो आजच्या सुनावणीसाठी पुन्हा नीट करण्यात आला आहे.

आर्यन खान गेल्या १८ दिवसांपासून तुरुंगात आहे. या प्रकरणी आर्यन ८ ऑक्टोबरपासून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत अं’मली पदार्थ बाळगल्याचा आणि वापरल्याचा आरोप आहे. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतागी यांचा युक्तिवाद काल पूर्ण झाला. त्यांनी आपल्या युक्तिवादात एनसीबी किंवा फिर्यादीबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यातील काही चॅट आले समोर, अंमली पदार्थावर बोलताना आढळले दोघं

-आर्यन खानची आजची रात्रही जाणार तुरुंगात, उद्या पुन्हा होणार जामीन अर्जावर सुनावणी

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

हे देखील वाचा