Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

हाय गर्मी! तेजस्विनीच्या हॉटनेसने इंटरनेटवर लावली आग, घायाळ करतोय तिचा दिलखेचक अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकीच एक आहे तेजस्विनी पंडित. तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. याठिकाणी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहते. तिचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. अशामध्ये तिचे नुकतेच समोर आलेले फोटोशूट पाहून, चाहते पुरते भांबावून गेले आहेत.

तेजस्विनीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात अभिनेत्री प्रचंड हॉट दिसत आहे. यातील तिचा कातिलाना अंदाज चाहत्यांना घायाळ करत असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बऱ्याच दिवसानंतर तेजस्विनीला अशा लूकमध्ये पाहून, चाहते भलतेच खुश झाले आहेत. (tejaswini pandit shared her latest green photoshoot on social media)

या फोटोमध्ये तिने बॉटल ग्रीन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीच्या आजूबाजूला हिरवळ दिसत आहे. यात तेजस्विनी ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देतेय, ते पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदांमुळे हा फोटो बघता बघताच व्हायरल झाला आहे. काही तासापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतपर्यंत २१ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. आता या फोटोवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांसोबतच कलाकार मंडळी देखील तिचे कौतुक करत आहेत. यावर सिद्धार्थ जाधव, सुखदा खांडकेकर, शाल्व किंजवडेकर, ऋतुजा बागवे यासारख्या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तेजस्विनी अखेरच्या वेळेस ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा