Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच तिच्या स्पष्टवक्ता स्वभावामुळे आणि वक्तव्यांमुळे ओळखली जाते. जितकी ती तिच्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहे, तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ती तिच्या वादांमुळे ओळखली जाते. कंगना नेहमीच तिच्या सडेतोड उत्तर आणि खरमरीत सोशल मीडिया पोस्टमुळे प्रकाशझोतात येते. नुकताच कंगनाला ‘मनकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र आता कंगनाचे नवीन फोटो व्हायरल होत आहे. कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना अंदमानला पोहचली आहे.

कंगना रानौत अंदमानला असणाऱ्या काळापाणी तुरुंगात पोहचली. याच तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिक्षा झाली होती. कंगना त्याच सेलमध्ये गेली जिथे सावरकरांना ठेवण्यात आले होते. इथे तिने सावरकरांचा आशीर्वाद घेतला आणि काही काळ तिथेच बसली. तिने त्या सेलमध्ये बसून, तोच त्रास समजून घेण्याचा प्रयत्न केला जो सावरकरांनी अनेक वर्ष भोगला होता. कंगनाने तिचे हे फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक मेसेज देखील लिहिला.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी आज अंदमान बेटावर आली आणि पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमधील काळापाणी सेलला भेट दिली. ज्या ठिकाणी वीर सावरकरांना कैदेत ठेवण्यात आले होते. मी खूपच हादरून गेले. जेव्हा अमानुषता टोकाला पोहोचली होती, तेव्हाच सावरकरांच्या रूपाने मानवता टोकावर गेली आणि अमानुषतेची भीती न बाळगता नजरेला नजर देत ते मोठ्या हिंमतीने निर्दयी, क्रूर शिक्षेला सामोरी गेले. प्रत्येक वाईट कृत्याचा त्यांनी विरोध केला.”

पुढे कंगनाने लिहिले, “इंग्रजांना सावरकरांची खूप भीती वाटत असावी कारण, त्यांना देण्यात आलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्यावेळी, समुद्राच्या मधोमध असणाऱ्या लहानशा बेटातून पळून जाणे निव्वळ अशक्य होते. तरीही, त्यांना इंग्रजांनी पायात साखळ्या बांधून ठेवत, एक जाड तटबंदीचा तुरुंग बांधला आणि त्यात असणाऱ्या एका छोट्या खोलीत कोंडले. जणू की, त्या अथांग समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वार होत ते काही उडूनच जाणार होते. यावरूनच ब्रिटिशांचा डरपोकपणा दिसून येतो. काळा पाणी तुरूंगातील हीच ती खोली आणि हेच स्वातंत्र्याचे सत्य आहे. आपल्या पुस्तकांमध्ये आपल्याला हे वास्तव कधीच शिकवले जात नाही. मी आज या कोठडीत ध्यान करून वीर सावरकरांबद्दल कृतज्ञतेने मनःपूर्वक आदर व्यक्त केला. स्वतंत्रता संग्रामातील या खऱ्या नायकास माझा कोटी कोटी प्रणाम…जय हिंद.”

कंगनाची या पोस्टवर नेटकरी तिचे कौतुक करत तिला एकापेक्षा एक सुंदर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा