स्पर्धा म्हटलं की हार जीत, धावपळ, गडबड गोंधळ तर असतोच. अशात अभिनेत्री प्रियांका चोप्राने आजवर आयुष्यातील आणि सिनेसृष्टीतील अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवलेला आहे. तिची चतुराई आणि हुशारी याचा अंदाज तिला मिळालेले राष्ट्रीय आणि अन्य पुरस्कारांवरून तुम्ही लावू शकता. एवढेच नाही तर, टाईम मासिकाच्या टॉप १०० शक्तिशाली महिलांमध्ये देखील तिने स्वतःचे नाव कोरले आहे. या सर्वांमध्ये ती साल २००० रोजी मिस वर्ल्डची विजेती झाली होती. अशात यावेळी तिने घेतलेली मेहनत आणि तिचा विजय सर्वांनीच पाहिला. परंतु यावेळी तिच्या बरोबर घडलेला हा अपघात अद्याप कुणालाच माहित नाही.
प्रियांकाला या अपघातामध्ये भाजले होते. या विषयीची माहिती तिने स्वतः ट्वीटरवर पोस्ट शेअर करत दिली. अभिनेत्रीने यावेळी तिची एक जुनी मुलाखत शेअर केली. यामध्ये ती २००० रोजी झालेल्या मिस वर्ल्डच्या आठवणी सांगत आहे. मुलाखतीमध्ये ती म्हणाली आहे की, “स्टेजवर जाण्याआधी मी स्टेजच्या मागे उभी होते. त्यावेळी तिथे माझ्यासारख्या आणखीन ९० मुली उपस्थित होत्या. सर्वजण इकडेतिकडे धावपळ करत होते. काही मुली केस ठीक करताना दिसत होत्या, तर काही मेकअप करत होत्या. यामध्ये मी माझे केस कर्ल करण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात एका मुलाचा मला जोरात धक्का लागला आणि हातात असलेल्या कर्ल मशीनचा मला चटका लागला आणि मला भाजले.” (Priyanka Chopra was burning her face just before the Miss World 2000 contest, read how she had hidden the stains)
Picture this…
“I was trying to curl my hair and there was like, 90 girls backstage, and everyone was moving around and getting their hair and make-up done. I was trying to curl my hair and somebody jostled me. I burnt myself and the skin scabbed,I had this big mark
(1/2) pic.twitter.com/2wjZHzGqbT
— Team Priyanka Chopra Jonas (@TeamPriyanka) October 28, 2021
असा लपवला भाजलेला डाग
प्रियांकाला त्यावेळी जो चटका लागला होता त्याने ती खूप घाबरली होती. मुलाखतीत ती पुढे म्हणाली की, “मी तो डाग कंन्सीलर आणि केसांनी लपवला होता.” प्रियांका ही एका आर्मी कुटुंबातील आहे. तिला जेव्हा चटका लागला होता तेव्हा ती खूप घाबरली होती. पण तिने यावर चिडचिड न करता स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि २००० साली ती मिस वर्ल्डची मानकरी ठरली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत
-सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…










