बॉलीवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींनी बिझनेसमनशी लग्न केले आहे. परंतु त्यातील अनेक अभिनेत्रींचा काही वर्षांनी घटस्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचाही समावेश आहे. करिश्माचे लग्न २००३ मध्ये बिझनेसमनशी झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या मतभेद निर्माण झाले. पुढे २०१६ मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. त्यावेळी करिश्माने म्हटले होते की, संजयने आपल्या आईला तिला चापट मारायला सांगितले होते.
संजय द्यायचा त्रास
करिश्मा आणि संजय यांचे प्रकरण बरेच दिवस न्यायालयात चालले होते. करिश्माने यादरम्यान कौटुंबिक अत्याचाराचा आरोपही लावला होता. तिने आपल्या याचिकेत म्हटले होते की, संजय तिला त्रास द्यायचा. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले होते.
पतीने आईला सांगितले करिश्माच्या गालावर चापट मारायला
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या याचिकेत करिश्माने एका गोष्टीचा उल्लेख केला होता. हा किस्सा तेव्हाचा होता, ज्यावेळी करिश्मा प्रेग्नेंट होती. त्यानंतर संजयने तिला एक ड्रेस घालायला सांगितले होते. परंतु तो ड्रेस तिला येत नव्हता. त्यामुळे संजयने आपल्या आईला करिश्माच्या गालावर चापट मारायला सांगितली होती.
संजय आणि करिश्मा यांना दोन अपत्य आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव समायरा कपूर आहे. ती १५ वर्षांची आहे, तर त्यांचा मुलगा किया राज कपूर आहे. तो ११ वर्षांचा आहे. सध्या हे दोन्ही मुलं करिश्मासोबतच राहतात.
करिश्माने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त दिल तो पागल है, रिश्ते, बीवी नंबर वन, जुडवा, हीरो नंबर वन आणि राजा बाबू यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या कामाला चाहत्यांकडून पसंती मिळाली.
सन २०२० मध्ये करिश्माने वेब सीरिझमध्ये पाऊल ठेवले. यावर्षी तिची मेंटलहूड ही वेब सीरिज रिलीझ झाली होती.
वाचा-
‘वडिलांनी माझ्यासाठी नाही बनवला चित्रपट’, नेपोटिझमवर अभिषेक बच्चनने सोडले मौन
गाना कॉपी करे…इथपर्यंत ठिक आहे भाऊ!! पण कपड्यांचीही कॉपी ? ते पण लग्नात…