बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अगदी लहानपणापासूनच केली. चित्रपटांत बालकलाकाराच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. या बालकलाकारांपैकी अभिनेत्री आदिती भाटिया ही एक आहे. तिने विवाह चित्रपटात साकारलेली छोट्या पुनमची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आदिती भाटिया रविवारी(29 ऑक्टोबर) आपला 24वा वाढदिवस साजरा करत आहे.
आदिती भाटियाचा जन्म 22 ऑक्टोबर 1999 रोजी मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव बीना भाटिया असून त्या व्यावसायाने शिक्षिका आहेत. आदितीचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले आहे. येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून तिने बारावी केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला शाळेत शिकण्याची खूप आवड होती. यासोबतच ती शाळेची टॉपर विद्यार्थिनी होती.
आदितीने लहान वयातच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून तिने अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. शाहिद कपूरचा ‘विवाह’ हा मल्टीस्टारर चित्रपट ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ याशिवाय ‘द ट्रेन’, ‘चांस पे डान्स’ आणि ‘सरगोशियां’ सारख्या चित्रपटांमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली.
‘विवाह’ चित्रपटात तिने अभिनेत्री अमृता रावची बालपणीची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने ‘चान्स पे डान्स’मध्ये शनायाची भूमिका साकारली होती. ‘द ट्रेन’ चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘मुलीची’ भूमिका करून सर्वांना इंप्रेस केले होते. आदितीने वयाच्या पाचव्या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. 2004 मध्ये ‘होम स्वीट होम’मध्ये तिने करिश्माची भूमिका साकारली होती. यानंतर 2007 मध्ये तिने ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ मध्ये तुलशीची भूमिका साकारली होती.
आदिती भाटियाने 2015 मध्ये ‘टशन-ए-इश्क’ या शोमध्ये बबली तनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2016 ते 2019 या काळात तिने ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत काम केले. तिच्या रुही भल्लाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अभिनेत्री असण्यासोबतच अदिती युट्युबर देखील आहे. जिथे ती तिच्या प्रवासाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. यासोबतच ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनीही तिच्या चाहत्यांचे भान हरवून नेते.
आदितीने तिच्या अभिनयाचा विस्तार करताना अनेक कॉमेडी शो देखील केले. 2018 मध्ये ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ आणि ‘कॉमेडी सर्कस’मध्येही काम केले. एवढेच नाही, तर 2019 मध्ये ती प्रसिद्ध कॉमेडियन भारतीच्या शो ‘खतरा खतरा खतरा’मध्येही दिसली होती. आदितीची बबली स्टाईल सगळ्यांनाच आवडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिती टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मध्ये सहकलाकार असलेल्या अभिषेक वर्माला डेट करत आहे. शोमध्ये त्यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. तसे, ती याबद्दल उघडपणे कधीच बोलली नाही.
हेही नक्की वाचा-
–श्वेता तिवारीच्या लेकीची तिच्यासारखीच हवा; पलकचा ‘तसला’ फोटो पाहून चाहत्यांनी लावला थेट डोक्याला हात
–श्वेता तिवारीच्या लेकीची तिच्यासारखीच हवा; पलकचा ‘तसला’ फोटो पाहून चाहत्यांनी लावला थेट डोक्याला हात