Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा ‘पावरस्टार’ पुनीतच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी; चिरंजीवी ते नागार्जुन, ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दु:ख

‘पावरस्टार’ पुनीतच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी; चिरंजीवी ते नागार्जुन, ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दु:ख

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारचे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) निधन झाले. त्याने अवघ्या ४६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बंगळुरू येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याची प्राणज्योत मालवली. पुनीतच्या निधनाने अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे. अनेक कलाकार त्याच्या निधनावर सोशल मीडियावर पोस्ट करून श्रद्धांजली वाहत आहेत.

सुपरस्टार चिरंजीवी यांनी ट्वीट करत पुनीतला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “धक्कादायक आणि हृदयद्रावक! #PuneethRajkumar खूप लवकर गेला. आत्म्यास शांती लाभो! कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. एकूणच कन्नड/भारतीय चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान. या दु:खद नुकसानाला तोंड देण्याची सर्वांना ताकद मिळो!”

दिग्दर्शक बोनी कपूर यांनाही पुनीतच्या निधनाचा मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “पुनीतच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच खूप धक्का बसला. एक शक्तिशाली अभिनेता, ज्याने आपल्या अविश्वसनीय अभिनयाने लोकांची मने जिंकली. #RIP #Gonetoosoon #PuneethRajkumar कुटुंबाप्रती संवेदना.”

सुपरस्टार नागार्जुन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “पुनीत राजकुमारच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना!! ही बातमी ऐकून धक्का बसला आणि हृदयद्रावक!! त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. #ripPuneethrajkumar.”

याव्यतिरिक्त सुपरस्टार मामूट्टी यांंनीही पुनीतच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “पुनीत आता नाही हे धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. हे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान आहे. पुनीतचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना.”

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूनेही पुनीतच्या निधनावर आपली प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “पुनीत राजकुमारच्या निधनाच्या दु:खद वृत्ताने धक्का बसला आहे. मी भेटलेल्या आणि संवाद साधलेल्या सर्वात नम्र लोकांपैकी एक. त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांप्रती मनःपूर्वक संवेदना”

अभिनेते मोहनलाल यांनीही पुनीतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “पुनीत राजकुमारच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. मला अजूनही या बातम्यांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते. मी लहान भाऊ गमावल्यासारखे वाटते. माझे विचार आणि प्रार्थना त्याच्या कुटुंबासाठी आहेत, ज्यांच्याशी माझे जवळचे नाते आहे. या नुकसानाचा सामना करण्यासाठी मी त्यांना शक्ती आणि सांत्वन देतो.”

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही पुनीतच्या निधनावर हळहळला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “हृदयद्रावक! भाऊ तुझी नेहमी आठवण येईल.”

 

 

पुनीत राजकुमारबद्दल-
अभिनेता पुनीतला चाहते ‘अप्पू’ म्हणायचे. तो दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा होता. त्याने २९ पेक्षाही अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बेट्टाडा हूवू’ असे त्या चित्रपटाचे नाव होते. एवढेच नाही, तर ‘चालिसुवा मोडागालू’ आणि ‘येराडू नक्षत्रगालू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला कर्नाटक राज्य पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. (Powerstar Puneeth Rajkumar Passes Away, Actors Express Shock)

पुनीत ‘अभि’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरसू’, ‘राम’, ‘हुदुगारू’ आणि ‘अंजनी पुत्र’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो शेवटचा ‘युवारत्न’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन; क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली माहिती

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा