बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अमित बहल यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी, उर्दू भाषेतील १०० हून अधिक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. त्यांना ओळखत नाही, असा क्वचितच कोणी असेल. अमित बहल यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळे कॉलेजच्या वेळीच ते थिएटरमध्ये आले. एक अभिनेता म्हणून त्यांनी अनेक भाषांमध्ये शो केले आहेत. अमित बहल शनिवारी (३० नोव्हेंबर) ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ते जवळपास २५ वर्षांपासून टेलिव्हिजन जगात सक्रिय आहेत.
‘शांती से’ शो मधून मिळाली ओळख
अमित यांना टीव्ही जगतात ओळख मिळाली ती टेलिव्हिजनच्या ‘शांती से’ या शोमध्ये मंदिरा बेदी मुख्य भूमिकेत दिसली होती. हा टीव्ही शो इतिहासातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. यामध्ये अमित बहल यांनी विजयची भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेपासूनच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.
‘या’ लोकप्रिय शोमध्येही केलंय काम
‘शांती से’ शिवाय अमित बहल हे अनेक शोमध्ये दिसले आहे. अमित यांनी ‘बुद्ध’, ‘सावित्री’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ आणि ‘प्रधानमंत्री’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. अमित यांनी आतापर्यंत विविध भाषांमधील १०० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अष्टपैलू अभिनयामुळे त्यांना एक खास ओळख मिळाली आहे.
कोरोनामधील संघर्ष
माध्यमांशी बोलताना, अमित यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, इतरांप्रमाणेच त्यांनाही साथीच्या आजारामुळे अडचणींचा सामना करावा लागला. ते म्हणाले, “जवळजवळ प्रत्येकजण संघर्ष करत होता. घराबाहेर कामाला जायला भीती वाटत होती. पण निघालो नाही, तर घर कसं चालणार. मी माझी एफडी मोडली, कर्जासाठी अर्ज केला, माझी गाडीही विकली. मात्र आता परिस्थिती चांगली होत आहे.”
टेलिव्हिजनचे हृदयात आहे विशेष स्थान
या संवादात अमित बहल म्हणाले होते की, जवळपास सर्वच माध्यमांमध्ये काम केल्यानंतरही त्यांच्या हृदयात टेलिव्हिजनसाठी विशेष स्थान आहे. ते म्हणाले की, “माझे स्वयंपाकघर गेल्या २५ वर्षांपासून चालत असेल, तर ते चित्रपट किंवा ओटीटीमुळे नव्हे, तर टेलिव्हिजनमुळे आहे.” त्यांनी या मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल
-आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर, बहीण सुहानाने व्यक्त केला आनंद; शेअर केले बालपणाचे फोटो