Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नानंतर अभिनयापासून दूर गेलेल्या ‘या’ अभिनेत्रींनी केले कमबॅक, काहींना मिळाले यश तर काहींना अपयश

लग्नानंतर सामान्य स्त्रियांचे करिअरवरील लक्ष कमी होते अगदी त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींचे देखील असेच काहीसे असते. लग्नानंतर इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींचे करिअर जवळपास संपुष्टात तर नक्कीच नाही येत मात्र काही अभिनेत्री स्वतःहून या क्षेत्रात काम करणे कमी करतात. याचे एकमेव हेच कारण आहे की, लग्नानंतर अभिनेत्री त्यांच्या कुटुंबाला अधिक वेळ देणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना आपल्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीत. मात्र जशा त्या त्यांच्या नवीन आयुष्यात रमतात तशा त्या त्यांच्या कामावर देखील परततात. आज आपण त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी लग्नानंतर काही काळाने मनोरंजन विश्वात कमबॅक केला.

दीपिका कक्कर :

दीपिका कक्कर ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने शोएब इब्राहिमशी लग्न केले आहे. आणि त्यानंतर ती हळूहळू पडद्यावरून गायब झाली. काही वर्षांनी ती ‘कहां हम कहाँ तुम’ या मालिकेत ती दिसली होती. पण ही मालिका फार काळ चालली नाही. त्यानंतर ती ‘ससुराल सिमर का २’ मध्येही दीपिका चाहत्यांवर तिची जादू चालवू शकली नाही.

वाहबिज दोराबजी :

टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजी अनेक दिवसांपासून टीव्ही जगतापासून दूर आहे. तिच्या लठ्ठपणामुळे ती अनेकदा ट्रोल झाली. मात्र ती थायरॉईडच्या आजाराचा सामना करत असल्यामुळे याचा परिणाम तिच्या वजनावर होत आहे. त्यामुळे तिचे वजन वाढले आहे. मात्र, ती अनेकदा ट्रोलर्सचे मत बाजूला ठेवून तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

जुही परमार

जुही परमारची ‘कुमकुम’ ही मालिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती. पण तिने अचानक टीव्ही जगताचा निरोप घेतला. मात्र, अनेक वर्षांनी जुही परमार ‘हमारी वाली गुड न्यूज’मध्ये दिसली. पण तिची ही मालिका चाहत्यांना काही विशेष आवडली नाही, त्यामुळे अल्पावधीतच जुहीची ही मालिका बंद पडली.

पूजा बॅनर्जी

पूजा बॅनर्जीने लग्न करत सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने अभिनेता कुणाल वर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर पूजाने एका मुलाला जन्म दिला, त्यामुळे तिचे वजन खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत आता पूजाने स्वतःला टीव्हीच्या जगापासून दूर केले आहे आणि ती आपला सर्व वेळ आपल्या मुलाला देत आहे.

कृतिका सेंगर

या यादीत लोकप्रिय अभिनेत्री कृतिका सेंगरच्या नावाचाही समावेश आहे. कृतिका सेंगर अचानक टीव्हीच्या जगापासून दुरावली. मात्र, ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती शेवटची ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत छोट्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा