Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आपण कधी नाचणारी म्हैस पाहिली आहे का? हा व्हिडीओ पहाल तर हसून वेडे व्हाल!

इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रसार झाल्यापासून आपल्याला खेडोपाडीच्या अनेक रंजक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या गोष्टी टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला पुर्वी सहसा पाहायला मिळत नसे.  परंतू आता याचे प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल यात मुक्या जनावरांच्या काही हटके व्हिडिओजचा देखील समावेश असतो. काही दिवसांपूर्वी एक कुत्र्याचं पिल्लू आणि मांजर भट्टीशेजारी शेक घेत बसले होते हा व्हिडीओ किती शेअर झाला. करोडो लोकांनी तो पाहिला. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कोणता आहे हा व्हिडिओ चला पाहुयात.

FreeSoulSimi नावाच्या एक यूजर ने त्यांच्या ट्विटर अकाउंट वर हा व्हिडिओ शेयर करताना सांगितले की हा म्हशीचा व्हिडिओ त्यांच्या बहिणीने पाठवला आहे. त्यांच्या शेजाऱ्यांकडे असलेली म्हैस माणसारखी नाचते. या व्हिडिओ मध्ये म्हशीला एक महिला नाचायला सांगते आणि ती म्हैस सुद्धा त्या महिलेने सांगितलेलं ऐकते आणि डांस करू लागते. एकतर ती म्हैस खरंच नाचतेय किंवा त्या बाईला वैतागून तसं करतेय. आपणही हा व्हिडीओ पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!

ती बाई स्वत: ‘ढोलक बजदा’ हे गाणं गाते आणि म्हशीसमोर थिरकतेय, मग ती म्हशीला नाचण्यासाठी सांगतेय आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे म्हैस त्या बाईचं ऐकते आणि तिच्या स्वत: च्या पद्धतीने नाचू लागते. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये काही मुलंही दिसत आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हैस नाचते तेव्हा ही मुले मोठ-मोठ्याने हसताना दिसतायत. ट्विटरवर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडतोय. फक्त ट्विटरवरच नाहींतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

हे देखील वाचा