मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. तसेच मालिकेची कहाणी देखील खूप वेगळी आणि वास्तविक आहे. मालिकेची खासियत म्हणजे मालिकेतील प्रत्येक पात्राला त्याची एक विशेष ओळख आणि स्थान आहे. यातील मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले हिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील तिच्या समंजस आणि विचारी पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेत आपण अरुंधतीला अनेकवेळा गाणे गाताना पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, वैयक्तिक आयुष्यात देखील ती एक खूप चांगली गायिका आहे. यासोबत मालिकेत ती जेवढी साधी दिसते त्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात मात्र ती खूपच मॉर्डन आहे. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.
मधुराणीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर डेनिम जॅकेट घातले आहे. यासोबत तिने निळ्या रंगाची पँट घातली आहे. तसेच केस मोकळे सोडले आहे. तिचा हा लूक पाहून तिला ओळखणे ही कठीण आहे. यात ती एकदम फिट आणि मॉर्डन दिसत आहे. (aai kuthe kay karte fame madhurani gokhale share her morden look on social media)
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “हा आहे अरुंधतीचा लूक, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” तिच्या या लूकवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. या रूपातील आई देखील सगळ्यांना खूप आवडली आहे. त्यामुळे सगळेच या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहे. मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाला आहे आणि अनिरुद्ध आणि संजनाचे लग्न झाले आहे. तसेच अरुंधती आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक बदल झालेले दिसत आहेत. त्यामुळे आता अरुंधतीचा गेटअप बदलणार आहे अशी सर्वत्र चर्चा चालू असताना. तिने हा फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास