भोजपुरी सिनेसृष्टीतील युवा स्टार प्रमोद प्रेमी यादवने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक गाणी दिली आहेत. त्याचा कोणताही म्युझिक व्हिडिओ आला की, चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत असतो. अनेकवेळा असे घडते की, त्याचा कोणताही व्हिडिओ येताच तो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो. अशा परिस्थितीत आता त्याचे नवीन छठ गाणे ‘घुंगटा उठवा आरग द’ प्रदर्शित झाले आहे. यामध्ये तो आपल्या सह-अभिनेत्री ‘पत्नी’सोबत छठ घाटावर जाताना दिसत आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे यात छठ पूजा कशी केली जाते, याचे वर्णन केले आहे. घाटावर जाऊन पूजा कशी केली जाते, हे गाण्यात दाखवले आहे.
सारेगामा हम भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर ‘घुंघटा उठवा अरग द’ या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. हे गाणे २ दिवसात १२ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. हे गाणे कृष्णा बेदर्दीने लिहिले आहे, तर संगीत आर्या शर्माने दिले आहे.
प्रमोदचे गाणे प्रत्येक चाहत्याच्या ओठावर आहे. अशातच आता हे गाणेदेखील चाहत्यांच्या ओठांवर रुळतंय. या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित होताच लोकप्रियतेच्या पायऱ्या चढत आहे. गाण्यात प्रमोद प्रेमीचा स्मार्ट लूक पाहायला मिळत आहे. हे छठ गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. देशभरात १० नोव्हेंबरला छठ मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. असे मानले जाते की, छठच्या चार दिवसांमध्ये सूर्यदेव आणि त्यांची बहीण छठी देवीची पूजा करतात. याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. छठ मायाची उपासना केल्याने धन, संपत्ती, संतती तसेच उत्तम आरोग्याची कामना केली जाते.
छठ गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर प्रमोद प्रेमी देखील या गाण्याबद्दल खूप उत्सुक आहे. या गाण्याची लिंक सोशल मीडियावर शेअर करून त्याने या गाण्याविषयी लिहिले आहे आणि सर्व प्रेक्षक, चाहत्यांना ते पाहण्याचे आवाहन केले आहे. हा म्युझिक व्हिडिओ यदुकुल स्टुडिओ आरा येथे रेकॉर्ड करण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अखेर मुनमुन दत्ताने शेअर केला तिच्या जोडीदाराचाच व्हिडिओ
-‘क्वीन’ म्हणत सलमान खानने उडवली खिल्ली; संतापलेल्या शमिताचे प्रत्युत्तर, भाईजाननेही घेतली शाळा
-शाहिदने लपून काढला मीराचा कपडे घालतानाचा व्हिडिओ, बघण्यासारखी होती पत्नीची रिऍक्शन