बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडव्यतिरिक्त तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आज जरी ऐश्वर्या कमी चित्रपटांमध्ये दिसत असली, तरीही एकेकाळी ती प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. ऐश्वर्याला तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांपासूनच चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. मात्र, नंतर ती चित्रपट नाकारत राहिली, ज्याचा तिला कदाचित आजही पश्चाताप होत असावा.
राजा हिंदुस्तानी
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, करिश्मा कपूरचे स्टारडम दुप्पट करणारा ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट पहिल्यांदा ऐश्वर्याला ऑफर करण्यात आला होता. ऐश्वर्या मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच हा चित्रपट तिला ऑफर करण्यात आला होता, पण ऐश्वर्याने तो चित्रपट नाकारला होता.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये मोठे चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी तिला संपर्क करू लागले. धर्मेश दर्शनने ‘राजा हिंदुस्तानी’साठी संपर्क केल्याचे तिने सांगितले होते. मात्र, ऐश्वर्याने तो चित्रपट नाकारला. ती मणिरत्नम आणि राजीव मेनन यांच्या कामाची चाहती असल्याने तिने पदार्पणासाठी त्यांचा ‘इरूवर’ हा चित्रपट निवडला. ‘इरूवर’ ऍवरेजवर असताना, ‘राजा हिंदुस्तानी’ ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या चित्रपटाने करिश्मा कपूरला स्टार बनवले.
‘कुछ कुछ होता है’
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले होते. ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला या चित्रपटात राणी मुखर्जीची भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण काही कारणांमुळे तिने ही ऑफर नाकारली. १९९९ मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते, “मी त्यावेळी नवीन असूनही माझी तुलना सर्व ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत केली जात होती. जर मी तो चित्रपट केला असता, तर सर्वांनी म्हटले असते की, ऐश्वर्याने मॉडेलिंगच्या काळात जे केले तेच पाहा. मिनीस परिधान करून कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पाऊट देतात. जर मी ‘कुछ कुछ होता है’ केला असता, तर मला लिंच केले असते.”
दिल तो पागल है
‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने याचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, यश चोप्रा तिला ‘मैने तो मोहब्बत कर ली’ या चित्रपटातून लॉन्च करायचे होते, पण ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारला. नंतर तो चित्रपट ‘दिल तो पागल है’ म्हणून प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.
मुन्नाभाई एमबीबीएस
तुम्हाला माहित आहे का? की, संजय दत्त आणि ग्रेसी सिंग अभिनित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये देखील ऐश्वर्याला ऑफर आली होती. मात्र, तिने नंतर हा चित्रपट नाकारला. त्यानंतर ही भूमिका ग्रेसी सिंगला देण्यात आली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि ग्रेसी सिंगचेही खूप कौतुक झाले.
वीर जारा
शाहरुख खान अभिनित ‘वीर जारा’ या चित्रपटासाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले होते. या चित्रपटात शाहरुख वीरच्या भूमिकेत दिसला होता, तर ऐश्वर्याला जाराच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले होते. या चित्रपटात राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याला साईन करण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र, ऐश्वर्याने काही कारणास्तव या चित्रपटाची ऑफर नाकारली.
दोस्ताना
ऐश्वर्याला ‘दोस्ताना’ची ऑफरही आली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऐश्वर्याचे शेड्यूल त्यावेळी खूप पॅक होते आणि तारखा नसल्यामुळे तिने करण जोहरचा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर त्यात प्रियांका चोप्राला साईन करण्यात आले.
बाजीराव मस्तानी
संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’साठी ऐश्वर्या पहिली पसंती होती. भन्साळींना पहिल्यांदा सलमान खान आणि ऐश्वर्यासोबत हा चित्रपट बनवायचा होता. पण सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या कडू कथेने सारा खेळच बिघडवला. हा चित्रपट वर्षानूवर्षे अडकला आणि त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगसोबत तो चित्रित केला.
भूलभुलैया
‘भूलभुलैया’ चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायला अप्रोच करण्यात आले होते. मात्र, ऐश्वर्याने ही भूमिका करण्यास नकार दिल्याने विद्या बालनला साईन करण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’