Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सर्वत्र प्रमोशन करत आहे. ते नुकतेच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांची जुगलबंदी आपण नेहमीच पाहिली आहे. अक्षय कुमार त्याच्या अनेक चित्रपटांना प्रमोट करण्यासाठी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला आहे. त्यावेळी अक्षय आणि कपिलची मस्ती सगळ्यांनीच पाहिली आहे. मजा-मस्ती करून ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यावेळी अक्षय ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत गेला आहे. त्या दोघांनी या मंचावर खूप मस्ती केली आहे

‘द कपिल शर्मा शो’मध्ये अक्षय कुमार गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहे, तर कॅटरिनाने फ्लेयर्ड स्कर्ट आणि स्ट्रेपी टॉप घातला आहे. या शोमधील अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Kapil sharma hilarious reaction on akshay kumar and katrina kaifs romance)

या व्हिडिओमध्ये अक्षय आणि कॅटरिना फोटोग्राफरला वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. दोघांनी रोमँटिक अंदाजात पोझ दिल्या आहेत. परंतु हे फोटो काढत असताना मधेच असे काही झाले की, ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. अक्षय आणि कॅटरिना जेव्हा पोझ देत असतात, तेव्हा अचानक पाठीमागून कपिल येतो आणि त्यांना वाकून बघत असतो. त्यामुळे त्यांचे फोटोशूट थांबते. त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचा मजेशीर अंदाज तुम्हाला समजेल.

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ जवळपास २ वर्ष वाट बघितल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद असल्याने अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. यातीलच ‘सूर्यवंशी’ हा एक चित्रपट आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशा अनेक बातम्या येत होत्या. परंतु निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अजय देवगण देखील दिसणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूर ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना आवडतात मसाबाने डिझाईन केलेले कपडे, पाहा तिची स्टाईल

-‘सलमान एकटा असून, त्याला खास व्यक्तीची गरज आहे’, म्हणत महेश मांजरेकरांनी केले दबंग खानच्या लग्नावर वक्तव्य

-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा