Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा

सध्या भारतात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत आहे. सगळेच त्यांच्या कुटुंबासोबत हा सण साजरा करत आहेत. सोशल मीडियावर देखील दिवाळीच्या शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अनेक मालिका आणि चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बघाल, तर तेजश्रीचे अगदी सुंदर आणि सोज्वळ सौंदर्याचे दर्शन घडते. तिने गडद जांभळ्या रंगाची एक सुंदर पैठणी घातली आहे. तसेच तिने यावर हिरव्या रंगाचा एक डिझायनर ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने गळ्यात हार, नाकात नथ आणि केसात गुलाबाची फुले माळली आहेत. या सगळ्या साजशृंगारात तिचे सौंदर्य अगदी खुलून आले आहे. पहिल्या फोटोमध्ये ती दारातील रांगोळी जवळ बसलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती फुलबाजे पेटवताना दिसत आहे. (Tejashri pradhan share her photos on social media and give best wishes of diwali)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला दिवाळीतील सगळ्या गोष्टी आवडतात. हे सण उत्सव तुम्हाला आयुष्यात सगळं काही चांगलं होणार आहे अशी आशा दाखवून उभारी देतात.” तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबत तेजश्रीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला देखील चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा