Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड या विज्ञान युगातही बॉलिवूडमधील ‘ही’ मंडळी आहेत अंधविश्वासू

या विज्ञान युगातही बॉलिवूडमधील ‘ही’ मंडळी आहेत अंधविश्वासू

अनेक व्यक्तींची अशी इच्छा असते की, त्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराची स्टाइल फॅशन फॉलो करावी. इतकेच नाही, तर चाहत्यांना त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, विज्ञानाच्या युगातही बॉलिवूडमधील काही कलाकार अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. शाहरुख खान असो किंवा सलमान खान अनेक लहान मोठे कलाकार अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे यशासाठी अंधश्रद्धेचा वापर करतात. चला जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्यांविषयी जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात.

शाहरुख खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा अंकशास्त्रावर ठाम विश्वास आहे. त्याच्या सर्व गाड्यांचे क्रमांक ५५५ आहेत. ज्योतिषाच्या सांगण्यावरूनही त्याने आपला संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीचा रंग काळ्यावरून जांभळा केला.

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हातात ब्रेसलेट घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. हे ब्रेसलेट सलमानला त्याचे वडील सलीम खान यांनी दिले असून, सलमान त्याच्या आरोग्यासाठी ते घालतो.

आमिर खान

कदाचित तुमच्या लक्षात आले असेल की, बॉलिवूड अभिनेता आमिर खान डिसेंबरमध्येच त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो. आमिर हा महिना त्याच्या चित्रपटांसाठी लकी मानतो.

दीपिका पदुकोण

प्रत्येक चित्रपटापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन मस्तक टेकवते. जेणेकरून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतील.

रणवीर सिंग

असे म्हटले जाते की, काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग चित्रपटाच्या सेटवर आजारी पडू लागला होता आणि त्याला दुखापतीही होत होत्या. त्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांनी रणवीरच्या पायात काळा दोरा बांधला, त्यानंतर तो बरा आहे.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना क्रिकेट पाहायला आवडते. पण ते कधीही भारताचा क्रिकेट सामना लाइव्ह पाहत नाहीत. त्यांनी सामना पाहिला, तर संघ हरेल, असे त्यांना वाटते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा