बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा शो ‘द बिग पिक्चर’ खूप लोकप्रिय होत आहे. रणवीर सिंगने त्याच्या या शोमध्ये अनेक प्रकारचे खुलासे करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच, त्याने शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठे रहस्य उघडले आहे. ‘लुंगी डान्स’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान दीपिका पदुकोणला इंप्रेस करण्याचा तो कसा प्रयत्न करत होता, हे रणवीर सिंगने सांगितले आहे.
वीकेंडच्या भागामध्ये दिव्यांश होस्ट रणवीरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्याच्या वडिलांबद्दलही बोलेल. दिव्यांशने रणवीरला सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या संघर्षात कशी साथ दिली. त्याच्या यशात त्याच्या वडिलांचा कसा मोठा वाटा आहे हे देखील त्याने सांगितले.
दिव्यांशने रणवीरला सांगितले की, तो त्याच्या गावातील पहिला व्यक्ती आहे जो सिव्हिल इंजिनियर झाला आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. रणवीर आणि दिव्यांश या दोघांनीही त्यांच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल संवाद साधला. दिव्यांशने वडिलांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी आलेल्या अडचणींबद्दल सांगितले. रणवीरने हे देखील सांगितले की, जेव्हा तो अमेरिकेत शिकण्यासाठी गेला तेव्हा त्याचे वडील आर्थिक संकटाला कसे सामोरे गेले.
रणवीरने दिव्यांशसोबत ‘लुंगी डान्स’ गाण्यावर डान्स केला. रणवीरने खुलासा केला की, जेव्हा दीपिका या गाण्याचे शूटिंग करत होती, तेव्हा तो दीपिका पदुकोणला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. रणवीर सिंगने सांगितले की, “लुंगी डान्स गाण्याच्या शूटिंगदरम्यान मी सेटवर दीपिकाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो.”
दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि हे इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केले होते. या जोडीने ‘गोलियों की रासलीला- राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचा पुढील चित्रपट ‘८३’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका त्याची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयाच्या कथेवर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?
-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी










